Download App

‘सागर’ बंगल्यावर येतो, माझा बळी घ्या; फडणवीसांनी एकाच वाक्यात विषय संपवला

Devedendra Fadnvis On Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच घमासान सुरु असताना आता मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सत्ताधारी सरकारवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांंचं नाव घेत गंभीर स्वरुपात आरोप केले आहेत. देवेंद्र फडणीसांना मला आयुष्यातून संपवायचं असून उपोषण करुन मरण्यापेक्षा सागर बंगल्यावर येतो माझा बळी, असं म्हणत जरांगे थेट सागर बंगल्याकडे निघाले आहेत. जरांगेंच्या आरोपांतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वाक्यात आरोपांचा विषय संपवल्याचं दिसून आलं आहे.

Chhagan Bhujbal : या वयात रायगडावर जाणं कौतुकास्पद पण निवडणुकीत तुतारी किती वाजेल सांगता नाही; भुजबळांचा टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले त्यावेळी फडणवीस कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर फडणवीस गाडीतून निघून जात असतानाच त्यांना जरांगे यांच्या आरोपांनंतरची पहिली प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्यावर बोलणं टाळलं असल्याचं दिसून आलं आहे.

माध्यमांकडून सवाल विचारण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी माझ्याबाबत नेमके काय आरोप केले आहेत, ते मी ऐकलेले नाहीत, ते ऐकून उत्तर देईल, या एका वाक्यात फडणवीसांनी उत्तर देत विषय संपवला आहे.

“कांदा निर्यातबंदी उठलीच नाही, फ्लेक्स लावून नुसतीच बनवाबनवी”; थोरातांचा विखेंना खोचक टोला

मनोज जरांगेंनी नेमके काय आरोप केले?
मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवेंद्र फडणवीस माझा एन्काऊंटर करण्याच्या विचारात आहेत. आज मराठा समाजाचा दरारा निर्माण झाला आहे. परंतु, मराठ्यांच्या हातूनच संपवण्याचे काम केले जात आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांचे दोन-चार आणि अजित पवार यांचेही दोन आमदार आहेत.

मनोज जरांगे ऐकत नाही म्हणून त्याला आता संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दहा टक्के आरक्षण लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनोज जरांगेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा मनोज जरांगेला उपोषणात मरू द्यावे यासाठी प्रयत्न केला जात आहे. मला सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जात आहे. त्यामुळेच मी परवा रात्रीपासून सलाईन बंद केले आहे’, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मला संपवण्याचं कारस्थान देवेंद्र फडणवीस यांनीच रचलं आहे. त्यांच्याच माध्यमातून वेगवेगळी लोकं पुढे करून माझ्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. मी आता थेट सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

follow us