Download App

देवेंद्रजींचं नाव घेत अमृतावहिनींचा उखाणा; विरोधकांवर सोडला बाण…

Image Credit: Letsupp

Amruta Fadnvis News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnvis) नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी कलाक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता राजकारणात नेहमी सक्रिय नाहीत पण पती देवेंद्र फडणवीस यांच्यामागे कायम उभे असतात. याचच उत्तम उदाहरण नागपुरच्या एका कार्यक्रमातलं आहे. नागपुरमध्ये भाजप महिला मोर्चाच्यावतीने आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात त्यांनी उखाणा देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत उखाणा घेतला आहे. या उखाण्यातून त्यांनी विरोधकांवर बाण सोडल्याचं पाहायला मिळालं आहे. उखाणा घेतानाच व्हिडिओ समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहे.

आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या पडद्यामागच्या ‘पाच’ खेळ्या’ अन् झारखंड भाजपच्या हाताला लागलेच नाही

कला क्षेत्रात काम करताना अमृता फडणवीस कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. नागपुरमध्ये महिलांसाठी खास हळदी-कुंकूच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विकासाचं वाण हळदी-कुंकू असं या कार्यक्रमाला नाव देण्यात आलं. या कार्येक्रमात अमृता फडणवीस यांनी संवाद साधला आहे. याचदरम्यान, बोलताना महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे उखाणा घेण्याचा आग्रह धरला. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी थेट देवेंद्रजींचं नाव घेत उखाणा घेतला आहे, मात्र, या उखाण्यातून त्यांचा रोख विरोधकांकडे असल्याचं दिसून आलं.

Pune Crime : धक्कादायक! राख अंगावर पाडल्याचं निमित्त अन् अंगावर सोडला थेट पिटबुल डॉग

अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आले विकासाचे वाण.. आपण सर्वांनी स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण’ असा खास उखाणा अमृता फडणवीस यांनी घेतला. अमृता फडणवीसांनी उखाणा घेताच कार्यक्रमस्थळावरील सर्वांनीच टाळ्या वाजवत त्यांना समर्थन दिलं. या उखाण्यात अमृता फडणवीस यांनी आपले पती देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक तर विरोधकांवर जोरदार बाण सोडल्याचं पाहायला मिळालं.

‘हिशोब तर द्यावाच लागणार’; कथित खिचडी घोटाळ्यावरुन सोमय्या-राऊतांमध्ये धुमश्चक्री

दरम्यान, अमृता फडणवीस यांचा या कार्यक्रमातील उखाणा घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला संमिश्र प्रतिसादही मिळताना दिसत आहे. अमृता फडणवीसांनी विरोधकांवरच बाण सोडल्याच्या कमेंटस् अनेकांनी दिल्या आहेत. नुकतंच त्यांचं राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर आलेलं ‘राम नाम’ हे भजन प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. अशातच आता पुन्हा एकदा त्यांनी उखाणा घेत बाण सोडल्याने चर्चेत आल्या आहेत.

follow us

वेब स्टोरीज