Download App

खातेवाटप होताच DCM एकनाथ शिंदेंनी गाठले दरेगाव, तीन दिवस करणार मुक्काम, नेमकं कारण काय?

उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर शिंदे प्रथमच त्यांच्या दरे या मूळ गावी आलेत. त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदेही पोहोचले.

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde: महायुती सरकारच्या (Mahayuti) सत्तेची घडी आता बसली. उपमु्ख्यमंत्रीपद कनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मिळाले असून अखेर सरकारचे खातेवाटपही जाहीर झालं. दरम्यान, आता उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर शिंदे प्रथमच त्यांच्या दरे या मूळ गावी आलेत. त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे देखील दरे गावी पोहोचले. एकनाथ शिंदे गावातील हेलिपॅडवर पोहोचताच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.

Parbhani violence : राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर; सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची घेणार भेट 

एकनाथ शिंदेंचे साताऱ्यातील दरेगाव हे त्यांना प्रिय आहे. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असतानाही शिंदे अधून-मधून त्यांच्या मूळ गावी येत असतं. ते अनेकदा गावी जाऊन शेतीत रमल्याचे पाहायला मिळाले. शिवाय, एकनाथ शिंदे यांना कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर ते दरेगावी जाण्याला प्राधान्य देतात. याआधी भाजपला मुख्यमंत्रीपद तर शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार हे निश्चित झाल्यानंतर एकनाथ शिंदे दरे गावी आले होते. त्यावेळीही तीन दिवस ते पूर्णवेळ गावी होते. या दरम्यान, महायुतीच्या महत्वाच्या बैठका त्यांच्या अनुपस्थितीमुळे होऊ शकल्या नव्हत्या.

‘यासाठीच होते का एक हैं तो सेफ हैं?’, मुलीचा विनयभंग करून मराठी कुटुंबाला मारहाण होताच वडेट्टीवार संतापले 

दरम्यान, गावात पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी काहीही बोलले नसून ते विश्रांतीसाठी गावात आल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे यांचा हा दौरा तीन दिवसांचा असून यादरम्यान ते पूर्ण विश्रांती घेणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

शपथविधीच्या आधीही शिंदे दरे गावी
राज्यात महायुती सरकारला मोठं बहुमत मिळालं, पण मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनाच मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मूळगावाची वाट पकडली होती. मात्र शिंदे नाराज नसून ते आजारी असल्याने विश्रांतीसाठी गावी गेल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगितल होतं.

पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच

महायुतीमध्ये पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. सातारा, रायगड, संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे. रायगड आणि संभाजीनगरवर शिवसेना नेत्यांनी दावा सांगितला आहे.

follow us