‘यासाठीच होते का एक हैं तो सेफ हैं?’, मुलीचा विनयभंग करून मराठी कुटुंबाला मारहाण होताच वडेट्टीवार संतापले
Vijay Wadettiwar : तीन दिवसांपूर्वी कल्याणमध्ये (Kalyan) एका मराठी कुटुंबावर दोन परप्रांतीय कुटुंबाकडून हल्ला करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा कल्याणमध्ये परप्रांतीयांच्या दादागिरीची (Bullying of immigrants) घटना समोर आली. एका मराठी कुटुंबाला परप्रांतीय कुटुंबाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. यावरून कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महायुती सरकार अन् भाजवर जोरदार टीका केली.
मराठी माणूस जर महाराष्ट्रात सेफ नाही तर कोण सेफ आहे? सामान्य मराठी कुटुंब तर आधीच दहशतीत होते, आता तर मराठी पोलीसही सुद्धा संकटात आहे, भाजपने दिलेल्या नाऱ्यातील हीच ती सुरक्षा असेल तर भाजपने आता पेढे वाटावे, जल्लोष करावा, अशी उपरोधिक टीका वडेट्टीवार यांनी केली.
यासाठी होते का “एक हैं तो सेफ हैं”?
परप्रांतियांकडून कल्याण मधील मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची संतापजनक घटना आज पुन्हा घडली आहे. या घटनेत परप्रांतीयांनी मराठी कुटुंबातील ९ वर्षांच्या मुलीशी असभ्य वागणूक केल्याची माहिती सुद्धा मिळत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर अश्या… pic.twitter.com/OuC3et76dG
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) December 22, 2024
वडेट्टीवर यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, यासाठी होते का “एक हैं तो सेफ हैं”? परप्रांतियांकडून कल्याण मधील मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची संतापजनक घटना आज पुन्हा घडली आहे. या घटनेत परप्रांतीयांनी मराठी कुटुंबातील ९ वर्षांच्या मुलीशी असभ्य वागणूक केल्याची माहिती सुद्धा मिळत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर अश्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मराठी माणूस जर महाराष्ट्रात सेफ नाही तर कोण सेफ आहे? सामान्य मराठी कुटुंब तर आधीच दहशतीत होते, आता तर मराठी पोलीस सुद्धा संकटात येत आहे, असं ते म्हणाले.
बीडमध्ये नवीन सिंघम, सरपंच हत्या प्रकरणाचा तपास करणारे नवनीत कॉवत कोण?
पुढं त्यांनी लिहिलं की, जाती धर्माच्या नावावर नारे देऊन समाजाचे विभाजन करणाऱ्या पक्षाच्या सरकारकडून जनतेने आणखी काय अपेक्षा करावी? निवडणुकीत भाजपने दिलेल्या नाऱ्यातील हीच ती सुरक्षा असेल तर भाजपने आता पेढे वाटावे, जल्लोष करावा… आनंद साजरा करावा, कारण मराठी माणूस देशोधडीला लागणार आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
नेमकी घटना काय?
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण जवळील आडिवली ढोकळी परिसरात एका चार वर्षांच्या मुलीचा परप्रांतीय व्यक्ती (पांडे) याने विनयभंग केला होता. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास पीडित मुलगी घरासमोर खेळत असताना पांडेने तिला घरात ओढले आणि तिच्याशी गैरवर्तन केलं. ही घटना मुलीने घरी येऊन सांगितली. त्यानंतर पांडे याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला पांडे आणि त्याच्या पत्नीने बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेत पीडितेचे वडील, आई आणि आजी जखमी झाले आहेत. मुलीचे वडील मुंबई पोलीस दलात कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.