मोठी बातमी! डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात शिंदे गटाच्या नगरसेवकाचा जामीन रद्द, चौघांची कारागृहात रवानगी
Corporator Ramesh Mhatre : डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटल डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रेंसह चौघांना मोठा धक्का.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. डॉक्टर मारहाण प्रकरणातील नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांचा जामीन सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. त्यानंतर चौघेही आज कल्याण कोर्टात हजर झाले.
न्यायालयात हजर झाल्यानंतर न्यायाधीश संतोष आगे यांनी रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी चौघांची आधारवाडी कारागृहात रवानगी केली आहे.