कल्याणध्ये पुन्हा परप्रांतियाची दादागिरी; अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून मराठी कुटुंबाला बेदम मारहाण..

  • Written By: Published:
कल्याणध्ये पुन्हा परप्रांतियाची दादागिरी; अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून मराठी कुटुंबाला बेदम मारहाण..

Kalyan News : तीन दिवसांपूर्वी कल्याणमधील एका हायप्रोफाईल सोसायटीत एका मराठी कुटुंबाला दोन परप्रांतीय कुटुंबांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेचे पडसाद विधानसभेतही (Vidhansaha) उमटले. यानंतर पोलिसांनी (Kalyan Police) याप्रकरणी आरोपीला अटक केली. दरम्यान, हे प्रकरण ताज असतानाच आता कल्याणमध्य पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या दादागिरीची (Bullying of immigrants) घटना समोर आली.

‘राज-उद्धव’ भेटीवर DCM एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची प्रतिक्रिया, म्हणाले, ‘ते दोघे एकत्र…’ 

पुन्हा एकदा एका मराठी कुटुंबाला परप्रांतीय कुटुंबाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या पत्नीनेही मारहाण केलीये. एका मराठी तरुणासह त्याच्या पत्नी आणि आईला मारहाण करण्यात आली. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, या प्रकरणी मारहाण करणारा व्यक्ती उत्तम पांडे आणि त्यांच्या पत्नीविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण जवळील आडिवली ढोकळी परिसरात एका चार वर्षांच्या मुलीचा परप्रांतीय व्यक्ती (पांडे) याने विनयभंग केला होता. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास पीडित मुलगी घरासमोर खेळत असताना पांडेने तिला घरात ओढले आणि तिच्याशी गैरवर्तन केलं. ही घटना मुलीने घरी येऊन सांगितलं. त्यानंतर पांडे याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला पांडे आणि त्याच्या पत्नीने बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेत पीडितेचे वडील, आई आणि आजी जखमी झाले आहेत. मुलीचे वडील मुंबई पोलीस दलात कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

बीडमध्ये नवीन सिंघम, सरपंच हत्या प्रकरणाचा तपास करणारे नवनीत कॉवत कोण? 

दरम्यान, या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुन्हा परप्रांतीयांचा प्रश्न ऐरणीवर
तीन दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबावर दोन परप्रांतीय कुटुंबाकडून हल्ला करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा परप्रांतीयांचा प्रश्न ऐरणीवर आला पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनाच मारहाण झाली आहे, त्यामुळे आता पोलिसही सुरक्षित नाहीत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube