Download App

20 जून जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा, संजय राऊतांचे संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र

Maharashtra politics : शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. शिवसेनेतील हे आजपर्यंतच सर्वात मोठं बंड होतं. गेल्या वर्षी 20 जूनला विधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी रात्री एकनाथ शिंदे सोळा आमदारांसह नॉटरिचेबल झाले होते. त्या रात्री ते सुरतला गेले. शिंदेंच्या बंडाची कुणकुण लागताच महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला होता. त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. आजचा दिवस म्हणजे 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा, या मागणीचे पत्र खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला (United Nations) लिहिले आहे.

संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की 20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाली, त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेनं रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे 16 आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्याचा राजकारणात एकच खळबळ उडाली. शिवसेनेच्या 40 आमदारांसह 52 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.

20 जूनला जे घडले त्याला वाघाचे काळीज लागते, एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना सुनावले

एका आमदाराने 50 खोके (50 कोटी) घेतले त्यामुळे 20 जून हा सर्व जगातील गद्दार दिन साजरा करण्यात यावा. यूनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल संयुक्त राष्ट्र संघटनेने जाहीर केल्यानंतर 2015 पासून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतोय. त्याप्रमाणे 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मंत्रिपद असतानाही विखेंचा थोरातांकडून ‘गणेश’मध्ये करेक्ट कार्यक्रम !

दरम्यान, शिवसेना आजचा दिवस स्वाभिमान दिन साजरा करणार आहे तर ठाकरे गट जागतिक खोके दिन म्हणून पाळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 20 जून गद्दार दिन म्हणून साजरा करणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्येक तालुका स्तरावर गद्दार दिन साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.

Tags

follow us