मुंबई : सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharastra Budget Session) निमित्तानं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि केसरकर (Deepak Kesarkar) समोरासमोर आले. आणि उद्धव ठाकरे आज दुपारी विधानभवन परिसरात आले. त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) देखील होते. तर, उद्धव ठाकरे हे एन्ट्री करणार आणि तेवढ्यात समोर दीपक केसरकर होते. तेव्हा केसरकरांनी उद्धव ठाकरे याना नमस्कार केला.
तेव्हा आदित्य ठाकरेंनी दुर्लक्ष केलं, पण उद्धव ठाकरेंचं लक्ष गेल्यावर त्यांनी हात दाखवत हास्यमुख चेहरा केला. ठाकरेंमध्ये आणि शिंदे गटामधील नेत्यांमध्ये असणारे मतभेद सर्वांना माहित तर आहेतच. पण तरीही विधीमंडळात हे दृश्य काहीस वेगळ दिसून आले आहे.
https://www.youtube.com/watch?v=N_-NCOncia8
नेमकं काय घडलं ?
अधिवेशन सुरू असताना शिंदे आणि ठाकरे गटाचा आमना- सामना झाला. आज देखील असा सामना बघायला बघायला मिळालं. उद्धव ठाकरे आज दुपारच्या सुमारास विधिमंडळ परिसरात आले होते. त्यांच्याबरोबर बरोबर माजी मंत्री आदित्य ठाकरे हे हे देखील त्यांच्याबरोबर होते. जेव्हा उद्धव ठाकरे यांची एन्ट्री करणार तेवढ्यात मंत्री दीपक केसरकर त्याठिकाणी होते. यावेळी केसरकरांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला.
गुलाबराव पाटील म्हणाले, ‘५० खोके, नागालँड ओके’, अजित पवार भडकले, मुख्यमंत्रीही बोलले
मात्र, उद्धव ठाकरेंनी केसरकरांकडे साफ दुर्लक्ष केले. यानंतर केसरकरांनी परत एकदा नमस्कार केला, मात्र तरी देखील ठाकरेंनी त्यांच्याकडे बघितले देखील नाही. तिसऱ्यांदा जेव्हा केसरकरांनी नमस्कार केला, तेव्हा ठाकरेंनी त्यांना प्रतिसाद दिला आहे. यावेळी केसरकरांच्या चेहऱ्यावरचे भाव, सारं काही सांगून जात होतं.
उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ तिथे आदित्य ठाकरे देखील आले. परत दीपक केसरकरांनी आदित्य यांनाही नमस्कार केला. पण, आदित्य ठाकरेंनी केसरकरांकडे न पाहताच, त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यांच्याशी न बोलताच ते तिथून निघून गेले आहे. ठाकरेंमध्ये आणि शिंदे गटात असणारे मतभेद सर्वांनाच माहित आहेत. पण तरीही विधीमंडळातील हे काहीस वेगळ वातावरण दिसून आले आहे.