Download App

‘वन्समोअर’ वादावर शिक्षणमंत्र्यांचं अजब स्पष्टीकरण, म्हणाले, मराठीत पर्यायी शब्द नाही

Deepak Kesarkar : इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकातील एका कवितेवरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

  • Written By: Last Updated:

Deepak Kesarkar : इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकातील एका कवितेवरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या कवितेवरून विरोधक राज्य सरकारसह शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहे. यातच आता राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ‘वन्समोअरला पर्यायी शब्द नाही आहे. एखादा शब्द यमक जुळवण्यासाठी इंग्रजी शब्द येऊ शकतो’, असं या कवितेवर स्पष्टीकरण दिल्याने पुन्हा एकदा या प्रकरणावरून आता राज्य सरकारवर टीका होताना दिसत आहे.

इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकातील ‘जंगलात ठरली मैफल’ या कवितेवरून सध्या एक नवीन वाद सुरु झाला आहे. या कवितेमध्ये हिंदी आणि इंग्रजीच्या शब्दांचा वापर करण्यात आल्याने विरोधकांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मात्र आता एखादा शब्द यमक जुळवण्यासाठी इंग्रजीतून येऊ शकतो असं स्पष्टीकरण शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे.

माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, ‘वन्समोअरला’ पर्यायी शब्द नाही,एखादा शब्द यमक जुळवण्यासाठी इंग्रजीतून येऊ शकतो त्यामुळे त्याचा फार मोठा बाऊ करण्याची गरज नाही असं केसरकर म्हणाले. तसेच भाषेत काही शब्द रूढ झाले आहे. आपण टेबलला टेबलचा म्हणतो, कपबशीला कपबशीच बोलतो. मी मराठी भाषेचा मंत्री आहे, मीच मराठी भाषेचे धोरण आणलं आहे त्यामुळे मला मराठीचा सगळ्यात जास्त अनुभव आहे.

18 वर्ष मराठी भाषेचं धोरण आलं नव्हत, तेव्हा कोणा त्याचा कळवळा आला नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या मराठी भाषेचा अभिमान आहे असेही शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले.

माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर पुढे म्हणाले की, ज्यावेळी एकाद्या गायकाने मराठीतलं चांगलं क्लासिकल गाणं म्हटलं तर आपण त्याला वन्समोअर,वन्समोअर असं म्हणतो. आपण त्याला पुन्हा एकदा पुन्हा एकदा असं टाळ्या वाजवून नाही म्हणत. त्यामुळे एक गोष्टी लक्षात घ्या, काही शब्द हे रूढ झालेले आहेत आणि मुलांना देखील त्या शब्दांची सवय झाली आहे.

आरक्षण बचाव यात्रेसाठी आंबेडकरांची जोरदार फिल्डिंग; पवारांसह सत्तेतल्या नेत्याला घातली गळ

समितीमध्ये तज्ज्ञ व्यक्ती काम करत असतात, त्या कामामध्ये माझा काहीही हस्तक्षेप नसतो मात्र तरीही देखील मी समितीला एकदा विचार करायला सांगतो असं देखील दीपक केसरकर म्हणाले.

follow us