संजय राऊत वि. नारायण राणे संघर्ष पेटला, राऊतांकडून अब्रुनुकसानीचा दावा दाखल

Sanjay Raut on Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात केलेले विधान भोवण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी अब्रुनुकसानीचा दावा (defamation case) दाखल केला आहे. आपण शिवसेनेत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठी खर्च केल्याचे वक्तव राणे यांनी केले होते. यामुळे पुन्हा राणे विरुध्द राऊत […]

Untitled Design (12)

Untitled Design (12)

Sanjay Raut on Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात केलेले विधान भोवण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी अब्रुनुकसानीचा दावा (defamation case) दाखल केला आहे. आपण शिवसेनेत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठी खर्च केल्याचे वक्तव राणे यांनी केले होते. यामुळे पुन्हा राणे विरुध्द राऊत असा राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो.

नारायण राणे (Narayan Rane) यांनी भांडूपमध्ये संजय राऊतांवरुन केलेल्या वक्तव्याविरोधात हा दावा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांचे मतदार यादीत नावही नव्हते. आपण शिवसेनेत असताना संजय राऊत यांना निवडून आणण्यासाठी खर्च केला होता, असे वक्तव्य राणे यांनी भांडूपमध्ये केले होते.

गोध्रा केसप्रकरणातील आठ दोषींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

याविरोधात राऊत यांनी फेब्रुवारी महिन्यात राणेंना नोटीस पाठविली होती. राणे यांनी पुराव्यानिशी हे दावे सिद्ध करावेत, असे यात म्हटले होते. राणे यांच्याकडून या नोटीशीला उत्तर देण्यात आले नाही. यामुळे राऊत यांनी मुलुंडच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

दुसरीकडे राऊत आणि अजित पवार यांच्यातील कलगीतुरा देखील रंगला आहे. अजित पवार यांनी कोण संजय राऊत असे वक्तव्य केले आहे. यावरुनही ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शरद पवार यांची आणि माझी नक्कीच भेट झाली. राजकारणातील दोन व्यक्ती एकत्र आले तर चर्चा तर होणारच तुम्हाला कळेल येत्या दिवसात नेमकी काय चर्चा झाली ते, असे सुतोवाच राऊत यांनी केले आहे.

Exit mobile version