Download App

Uddhav Thackeray : मोदी – शाहांच्या हुकुमशाहीचा कर्नाटकात पराभव; आता BJP ला महाराष्ट्रातूनही हाकलू

Defeat of Modi-Shah dictatorship in Karnataka assembly elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (karnataka assembly elections) चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. कर्नाटकात काँग्रेसने (Congress) बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेस 136 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे 64 जागांचा आकडा पार करताना भाजपची (BJP) दमछाक झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निकाल लागल्यानंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘ कर्नाटकात सामान्य माणसाने हुकूमशाहीचा पराभव केला आहे’, अशा शब्दात खोचक टीका केली आहे.

कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपचे सर्व कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रचार करत होते. पण, या निवडणुकीचे निकाल आता समोर आले असून कॉंग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. उध्दव ठाकरे यांनी सांगितलं की, कर्नाटकातील विजयाने देशातील निरंकुशता आणि हुकूमशाहीचा पराभव सुरू झाला असं सांगितलं. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर व्यापक चर्चा झाली, शिवाय, कर्नाटकच्या निवडणुक निकालावरही चर्चा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

Karanatak Election 2023 : लोकांनी राष्ट्रवादीचं पार्सल परत पाठवलं, फडणवीसांचा पवारांना टोला

सुज्ञ निर्णयाबद्दल कर्नाटकातील जनतेचे अभिनंदन, अशा शब्दांत ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली असून आशेचा किरण दाखवला आहे. काँग्रेसने दणदणीत विजय मिळवलाच आहे, पण, कर्नाटकातील जनतेने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांची जबरदस्ती बेधडकपणे फेकून दिली, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

ते म्हणाले, ‘कर्नाटक निवडणुकीत हिंदू, मुस्लिम, बजरंगबली, हिजाब असे धार्मिक मुद्दे चालले नाहीत. काँग्रेसने सार्वजनिक प्रश्नांवर निवडणुका लढल्या आणि जिंकल्या. कर्नाटकीतल हा विजय 2024 च्या निवडणुकांची नांदी ठरेल, असं सांगत त्यांनी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांचे विशेष अभिनंदन केले.

दक्षिणेचा प्रदेश भाजपच्या हातातून गेला आहे. कर्नाटकात भाजपला नाकारण्यात आले आहे. भाजप फोडाफोडीचे राजकारण करत आहे हे लोकांना पटत नाही. भाजपला कर्नाटकातून हाकलून दिले, आता महाराष्ट्रातून हाकलले जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिले.

follow us