राऊत, फाऊत, दाऊद म्हणत Devendra Fadanvis यांची ठाकरे, राऊतांवर तुफान हल्ला

Devendra Fadanvis-Mumbai : आलीकडच्या काळात बाजारबुणगे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलतात. त्या बाजारबुणग्यांना सांगतो. सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका. सूर्यावर थुंकता येत नाही. त्यामुळे हे कोणी राऊत, फाऊत, दाऊदने पंतप्रधान मोदी यांच्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये. ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडेल. अशा थुंकीचे तोंड पाहायची कोणाचीही इच्छा नाही, अशा शब्दांत तुफान हल्ला उद्धव ठाकरे आणि […]

Mahavikas Agadi Devendra Fadnavis

Mahavikas Agadi Devendra Fadnavis

Devendra Fadanvis-Mumbai : आलीकडच्या काळात बाजारबुणगे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलतात. त्या बाजारबुणग्यांना सांगतो. सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका. सूर्यावर थुंकता येत नाही. त्यामुळे हे कोणी राऊत, फाऊत, दाऊदने पंतप्रधान मोदी यांच्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये. ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडेल. अशा थुंकीचे तोंड पाहायची कोणाचीही इच्छा नाही, अशा शब्दांत तुफान हल्ला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत सोमवारी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढली होती. या यात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. विशेषतः काँगेसचे नेते राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर फडणवीस यांनी तुफान हल्ला केला.

सावंतांची राणा पाटलांवर कुरघोडी : Eknath Shinde यांनी दिला भाजपबरोबर ‘मविआ’ला धक्का! – Letsupp

उद्धव ठाकरे हे इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी, जयंतीला हार अर्पण करतात. पण मला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला कधी सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी हार अर्पण केला आहे, असे दाखवा. अहो त्यांनी साधं एक ट्विट तरी केले आहे का, अशा काँग्रेसच्या लोकांबरोबर आज उद्धव ठाकरे हे मांडीला मांडी लावून बसले आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्याच मित्र पक्षाने स्वातंत्र्यवीर सावरकर समलैंगिक असल्याचे मुखपृष्ठ काढले होते. तरीही तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात. तुमच्यामध्ये थोडा जरी स्वाभिमान असता ना तो तुमच्या कृतीत दिसला असता. पण तो स्वाभिमान तुमच्यात दिसला असता. अन्यथा तुम्ही तो स्वाभिमान दाखवत राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्याचे काम केले असते. खरी शिवसेना आमच्यासोबत असल्याने आम्ही राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्याचे काम आम्हीच केले आहे.

(8) Omraje Nimbalkar & Kailas Patil : खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची ‘बदले की आग’ | – YouTube

Exit mobile version