सावंतांची राणा पाटलांवर कुरघोडी : Eknath Shinde यांनी दिला भाजपबरोबर ‘मविआ’ला धक्का!
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षासह महाविकास आघाडीला मोठा झटका दिला आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब मतदार संघाचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते फोडत आज त्यांचा एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षात प्रवेश करून घेतला. एक प्रकारे उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर राजकीय कुरघोडी केल्याची चर्चा आहे.
कळंब तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तीन माजी नगराध्यक्ष, सहा माजी उप नगराध्यक्ष, दोन माजी नगरसेवक यांच्यासह जवळपास २०-२५ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला.
Supreme Court : दरोड्याच्या घटनेतील आरोपी : तब्बल २८ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता! – Letsupp
धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघ हा भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राणाजगजीतसिंह पाटील यांनी मतदार संघ बदलत तुळजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली. आज मुंबई येथे प्रवेश करणारे बहुतांश पदाधिकारी हे राणा जगजीतसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना त्यांचे कट्टर समर्थक होते.
पुढे राणा जगजीत सिंह पाटील यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. मात्र, हे सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबले होते. परंतु, त्यांचा पाटील यांच्या बरोबर नियमित संपर्क होता. या सर्वांचा पक्ष प्रवेश करून मंत्री तानाजी सावंत यांनी एकप्रकारे राणा पाटील यांच्यावर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे.