Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागपूरमध्ये केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी फडणवीस म्हणाले की, कॉंग्रेस त्यांच्या रॅलीतून म्हणत आहे की, है तैयार हम पण लोक तयार नाहीत. तसेच ते राहुल गांधी यांनी राजा-महाराजांचा अपमान केल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.
…पण लोक तयार नाहीत
राहुल गांधी यांनी नागपूरमधील भाषणात भाजपवर टीका केल्यानंतर फडणवीसांनी राहुल गांधीच्या भाषणावर म्हटले की, कॉंग्रेसही महारॅलाी नव्हती तर ती एक सुक्ष्म रॅली होती. राहुल गांधी भाषण करायला लागले तेव्हा लोक उठून जात होते. तसेच कॉंग्रेसने या रॅलीसाठी है तैयार हम ही टॅगलाईन ठरवली आहे. पण लोक तयाक नाहीत. तसेच ते राहुल गांधी आणि कॉंग्रेसचं ऐकण्याची इच्छा देखील लोकांमध्ये नाही.
‘बेरोजगारीमुळे तरुणांची ताकद सोशल मीडियावर वाया’; गांधींची ‘अग्निवीर’चा दाखल देत सडकून टीका
त्याचबरोबर या भाषणामध्ये राहुल गांधी यांनी देशातील राजघराण्यांचा अपमान केला आहे. असा आरोप फडणवीसांनी केला. राहुल गांधी म्हणाले हेते की, देशातील काही राजघराण्यांनी इंग्रजांसोबत साठ-गाठ बांधली होती. त्यावर फडणवीस म्हणाले की, कित्येक राजघराण्यांनी संस्थानांनी देशाच्या स्वतंत्र्यामध्ये योगदान दिलं आहे. इंग्रजांशी लढा देत स्वतःच अस्तित्त्व जपलं आहे. मात्र राहुल गांधींच्या खोट्या आरोपांमुळे त्यांचा अपमान झाला आहे. असं यावेळी फडणवीस म्हणाले आहेत.
>इंडिया आघाडीत भाजपकडून फूट पाडण्याचा प्रयत्न, खरगेंचं मराठीत खणखणीत भाषण
दरम्यान राहुल गांधी यांनी देशात विचारसरणीची लढाई सुरू आहे. तर भाजपमध्ये गुलामी आणि राजेशाही प्रमाणे कारभार चालतो. यावेळी त्यांनी एका भाजप खासदाराची भेटीचा किस्सा देखील सांगितला. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी मला भाजपचे एक खासदार लपून-छपून भेटले होते. ज्याप्रमाणे भाजपमध्ये असलेले अनेक खासदार पूर्वी काँग्रेसमध्ये होते. तसेच ते देखील होते. मात्र ते मला भेटले त्यांनी मला सांगितलं की, भाजपमध्ये माझी घुसमट होत आहे. माझं शरीर भाजपमध्ये आहे. मात्र माझं मन हे काँग्रेसमध्ये आहे. कारण भाजपमध्ये गुलामी चालते. जे वरून सांगितलं जातं तेच करावं लागतं. आमचं कोणी ऐकत नाही. राजेशाही प्रमाणे भाजपमध्ये कारभार चालतो.