PM मोदींचा स्वभाव, आदेश अन् कार्यपद्धत; राहुल गांधींनी सगळचं बाहेर काढलं
Rahul Gandhi On Pm Narendra Modi : आगामी निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी अटीतटीची लढाई होणार असल्याचं दिसून येत आहे. कारण निवडणुका जिंकण्यासाठी दोन्ही पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आज नागपुरात आयोजित महारॅलीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra) यांचा स्वभाव, आदेश, आणि कार्यपद्धतीवरुन जोरदार हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, नागपुरात आज काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.
रामराजे निंबाळकर-मोहिते पाटलांची ‘टाईट फिल्डिंग’; माढ्यात रणजितसिंहांचा गेम होणार?
राहुल गांधी म्हणाले, भाजपमध्ये असलेले खासदार आधी काँग्रेसमध्येच होते. त्यातील एक खासदार मला लपून छपून भेटला. त्याची मी विचारपूस केली असता, भाजपमध्ये वरुन आदेश येतो, तो आदेश डोकं न लावता पाळावा लागतो, भाजपमध्ये आदेश न पाळण्याची कोणतीही सोय नाही. भाजपमध्ये गुलामी चालत असून आता सहन होत नसल्याचं खासदारांनी सांगितलं असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं आहे.
कुणाचं ऐकणं हे मोदींच्या स्वभावात नाही :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वभावात कुणाचं ऐकूण घेणं नाही. पंतप्रधान मोदींना कुणीही प्रश्न विचारलेलं आवडत नाही. नाना पटोलेंनीही प्रश्न विचारले होते. त्यामुळेच त्यांना भाजपकडून बाहेर आऊट केलं आहे. भाजपचा कोणताही कार्यकर्ता मोदींना काही सांगू शकत नाही. माझं चुकलं तर कार्यकर्ते मला सांगतात. मी कार्यकर्त्यांच्या मताचा मान ठेवतो, अशी खोचक टीकाही राहुल गांधींनी मोदींवर केली आहे.
Sanjay Raut : ‘निमंत्रण देणारा भाजप कोण? आम्ही अयोध्येला जाणारच पण’.. राऊतांनी ठणकावलं!
काँग्रेसमुळेच जनतेला मतदानाचा अधिकार :
स्वातंत्र्यानंतर इथल्या महिलेला, दलितांना, आदिवासींसह सर्व जनतेला मतदानाचा अधिकार गांधी-नेहरु-आंबेडकरांनी काँग्रेसच्या माध्यमातून मिळवून दिला आहे. या विचारधारेविरोधात भाजपची विचारसरणी आहे. स्वातंत्र्याआधी दलित, आदिवासी, महिलांना अधिकार नव्हते. स्वातंत्र्यानंतरच हे अधिकार मिळाले आहेत. ही आरएसएसची विचारधारा आम्ही बदलली असल्याची जहरी टीकाही राहुल गांधींनी यावेळी केलीयं.
भाजपची विचारधारा ही राजा महाराजासारखीच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या जनतेने स्वातंत्र्याची लढाई लढवली आहे. इथल्या राजा महाराजांमध्ये आणि इंग्रजांमध्ये भागीदारी होती. या देशाला आधी राजा महाराजा चालवत असत. अगदी तशीच आज देशात भाजपची परिस्थिती झाली असल्याचीही टीका राहुल गांधींनी केली आहे.