Download App

New Parliament Building Controversy : …तेव्हा इंदिराजींवर बहिष्कार का नाही घातला? फडणवीसांचा विरोधकांना सवाल

Devendra Fadanvis on New Parliament Building Controversy : देशाला नवीन संसद भवन मिळणार आहे. येत्या 28 तारखेला पंतप्रधान मोदी संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटन करण्यावरुनच सगळा वाद पेटला आहे. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती किंवा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते व्हावे. आता विरोधकांनी पुढचे पाऊल गाठत या कार्यक्रमाचा बहिष्कार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

New Parliament : नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर ममता बनर्जींचा बहिष्कार?

फडवीस म्हणाले की, ‘हे केवळ संसद भवन नाही, ते 140 कोटी लोकांच्या आस्थेचं मंदिर आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालणं म्हणजे लोकशाहीला नाकारण्यासारखं आहे. ते एकीकडे म्हणताता पंतप्रधानांनी नाही तर राष्ट्रपतींनी संसदेचं उद्घाटन करावं. त्यांनी मी सांगतो की, इंदिरा गांधीजींनी जेव्हा संसदेच्या अॅएक्स बिल्डींगचं उद्घाटन केलं. तेव्हा तुम्ही बहिष्कार का नाही घातला? इंदिराजींनी महाराष्ट्राच्या विधान भवनाचं उद्घाटन केलं तेव्हा ते राज्यपालांच्या हस्ते का करण्यात आलं नाही?’

New Parliament : विरोधी पक्षांच्या आवाहनाला 3 पक्षांचा ‘खो’; 2 संभ्रमात, औवेसी कुंपनावर

‘तसेच राजीव गांधींनी संसदेच्या ग्रंथालयाचं उद्घाटन केलं तेव्हा राष्ट्रपतींची का आठवण आली नाही? त्याचबरोबर तमिळनाडूच्या विधानसभेचं उद्घाटन देखील सोनियांनी केलं. तिकडे बिहारमध्ये नितिश कुमारांनी त्यांच्या सेंट्रल हॉलच उद्घाटन केलं. त्यावेळी जेडीयूने बहिष्कार का नाही घातला? युपीएच सरकार असताना मनमोहन सिंग आणि सोनियांनी मणिपूरच्या इम्फाळमध्ये तेथील विधान भवनाचं उद्घाटन केलं होतं. तेव्हा राज्यपालांच्या हस्ते ते का करण्यात आलं नाही?’ यांसारखे अनेक इतिहासातील दाखले देत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांनी नवीन संसदेच्या उद्घाटनावर घातलेल्या बहिष्कारावर टीकास्त्र सोडलं आहे.

पुढे फडणवीस असं देखील म्हणाले की, देशात पहिले फक्त कॉऊंसिल हॉल होता. आता संसद निर्माण झाली आहे. त्याला विरोद का? हे सगळो लोर खुर्चीचे सौदागर आहेत. सत्तेचे सौदागर आहेत ते मोदीजाींचा मुकाबला करू शकत नाहीत. त्यासाठी ते एकत्र आले आहेत. मात्र मी जे उदाहरण दिले त्यावेळी बहिष्कार का टाकला नाही? याचं उत्तर द्या. असं फडणवीस म्हणाले विरोधकांकडे ना नेता, ना नीती, ना नियत आहे. विरोधकांना मोदींची लोकप्रियता पाहवत नाही. पण यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही असा टोला देखील फडणवीसांनी लगावला.

नवीन संसदेच्या उद्घाटनावर 19 पक्षांचा बहिष्कार

संसद भवन उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोध वाढत चालला आहे. आतापर्यंत 19 राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. या पक्षांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे म्हटले आहे. यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, जनता दल (युनायटेड), राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना (उबाठा), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), समाजवादी पार्टी, राजद, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, इंडियन युनियन मुस्लीम लीग, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फ्रेन्स, केरळ काँग्रेस (मणि), रिवोल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी, विदुथलाई चिरुथिगल, कच्ची, मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कडगम, राष्ट्रीय लोकदल या पक्षांचा समावेश आहे.

Tags

follow us