Devendra Fadanvis & Eknath Shinde Meeting : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election Result) लागल्यानंतर आता सरकार स्थापनेसाठी महायुतीकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. निकाल लागून आठ दिवस होत आले तरीही अद्याप महायुतीचं सरकार स्थापन न झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना ऊत आलायं. त्यात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची अचानक तब्येत बिघडल्याने ते गावी गेल्याचं समोर आलं. तर भाजपकडून अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्यात आलेला नाही. तर अजित पवार आणि शिंदे गटात खातेवाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जातंय. या संपूर्ण घडामोडींवर अखेर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जात तातडीने भेट घेतलीयं. या भेटीवरुन आता महायुतीचा सत्तास्थापनेचा तिढा सुटला असल्याची चर्चा सुरु झालीयं.
Video : एकनाथ शिंदे काम करू शकणार का?; तपासणी केलेल्या डॉक्टरांनी दिलं महत्त्वाचं उत्तर!
मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावी गेले होते. त्याचवेळी त्यांची तब्येत बिघडली. दोन ते तीन दिवसांपासून शिंदे साताऱ्यातच होते. भाजपचे अनेक नेतेमंडळी त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर अखेर आज एकनाथ शिंदे तपासणीसाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर शिंदे यांचा
ताफा वर्षा निवासस्थानी निघाला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीयं. शिंदे-फडणवीसांची जवळपास अर्धा तास चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीत दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र आता महायुतीचा तिढा सुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.
बॉलिवूडला मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची ओढ; साऊथचा ‘हा’ अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका
महायुतीत कधीही नाराजी नव्हती…
देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर या भेटीबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले, महायुतीमध्ये कधीही नाराजी नव्हती आणि नाही. एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नव्हती. ते रुग्णालयात दाखल होते. ते नाराज असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहेत. जनतेने त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केलंय. शपथविधीच्या कार्यक्रमाला शिवसेना सहभागी होणार असल्याचं पावसकरांनी स्पष्ट केलंय.