Download App

तुम्ही अमेरिकेच्या तिजोरीवर डल्ला मारलाय का? फडणवीसांची शरद पवार, राहुल गाधींवर टीका

पवार साहेबांनी आधी राहुल गांधींना विचारावं की त्यांचे खटाखट खटाखट जे साडे आठ हजार रुपये येणार होते ते कुठून येणार होते? - देवेंद्र फडणवीस

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamnatri Ladaki Bahin Yojana) जाहीर करण्यात आली आहे. या योजनेच्या लोकप्रियेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या योजनेवरून विरोधकांनी महायुती सरकावर (Mahayuti) जोरदार टीका होत आहे. दरम्यान, विरोधकांकडून होत असलेल्य टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) जोरदार प्रत्युत्तर दिलं.

चांदीवाल अहवाल मविआच्या काळातच आला, त्यांनी तो प्रसिद्ध का केला नाही? फडणवीसांचा पलटवार 

राहुल गांधींनी साडेआठ हजार रुपये देण्याची घोषणा केली, त्यांनी काय अमेरिकेच्या तिजोरीवर डल्ला मारलाय का? असा खोचक सवाल फडणवीसांनी केला.

अलीकडेच शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवरून सरकावर टीका केली होती. लाडकी बहिण योजनेसाठी पैसे कुठून येणार? असा सवाल केला होता. त्यानंतर आज नागपूर भाजप जिल्हा विस्तारित कार्यकारींच्या बैठकीत बोलतांना फडणवीसांनी राहुल गांधी – शरद पवारांवर जोरदार टीका केली.
फडणवीस म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा करत पंधराशे रुपये महिलांना देण्याचा निर्णय घेतला. तर शरद पवार साहेब विचारतात या योजनांसाटी पैसे कुठून आणणार? पवार साहेबांनी आधी राहुल गांधींना विचारावं की त्यांचे खटाखट खटाखट जे साडे आठ हजार रुपये येणार होते ते कुठून येणार होते? ते जर साडेआठ हजार रुयपे देऊ शकतात. तर आम्ही पंधराशे रुपये का देणार नाही? त्यांच्याकडे का झाडाला पैसे लागले का? त्यांच्याकडे सोन्याचे हंडे आहेत का? त्यांना काय लॉटरी लागली आहे का? की त्यांनी अमेरिककेच्या तिजोरीवर डल्ला मारला? असा सवाल फडणवीसांनी केला.

Bangladesh Protest: बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला ! संघर्षात 72 जणांचा मृत्यू 

पुढं बोलतांना फडणवीस म्हणाले, केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकरी, तरुण आणि महिलासांठी योजना राबवत आहे. केंद्राने शेतकऱ्यांचा सहा हजार रुपयांचा विमा उतरवल्याचा हा देशातील विक्रम आहे. कापूस आणि सोयाबीनचे भाव घसरले. त्याच्यासाठी आपण निर्णय घेतला. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. आपले निर्णय यांच्यासारखे नाहीत, निवडणूक झाले की बंद केलं. तर या योजना पुढेही सुरूच राहणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

follow us