चांदीवाल अहवाल मविआच्या काळातच आला, त्यांनी तो प्रसिद्ध का केला नाही? फडणवीसांचा पलटवार

चांदीवाल अहवाल मविआच्या काळातच आला, त्यांनी तो प्रसिद्ध का केला नाही? फडणवीसांचा पलटवार

Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आता सचिन वाझे (Sachin Waze) यांची या प्रकरणात एंट्री झाली. त्यांनी देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा आरोप केला. यानंतर देशमुखांनी चांदीवाल आयोगाच्या (Chandiwal Commission) अहवालाची प्रत दाखवून फडणवीसांनी हिंमत असेल तर चांदीवाल अहवाल सार्वजनिक करावा, असं म्हटलं. यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.

Bangladesh Protest: बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला ! संघर्षात 52 जणांचा मृत्यू 

फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, चांदिवाल आयोगाचा अहवाल महाविकास आघाडीच्या काळात आला होता. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीच सरकार असतांना त्यांनी तो अहवाल प्रसिद्ध का केला नाही? याचं उत्तर त्यांनी आधी द्यावं. मुळात परवमीर सिंह यांना महाविकास आघाडीने आयुक्त केलं होतं. अनिल देशमुख गृहमंत्री असताना स्वत: परमवीर यांनी त्यांच्यावर आरोप केले होते. खरं तर विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून एखादा पोलीस आयुक्त गृहमंत्र्यावर आरोप कसे करेल? त्यामुळे या सगळ्य कपोलकल्पित गोष्टी आहेत. यात काहीही अर्थ नाही, असं म्हणत फडणवीस यांना देशमुख यांच्या आरोपांचं खंडन केलं.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर तैनात 

पुढे बोलताना फ़डणवीस म्हणाले, उच्च न्यायालयानेच अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्याच सांगण्यावरून हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं. यात केंद्र सरकारचा काहीही संबंध नव्हता. त्यावेळी न्यायालयाने जे आदेश दिले, ते बघितले तर या सर्व गोष्टी स्पष्ट होतील. मी मुद्दाम या सर्व प्रकरणांवर वारंवार बोलत नाही. कारण, रोज अशाप्रकारे कुणी येऊन बोलत असेल तर त्यांच्या स्तरावर जाऊन या प्रकरणावर बोलायची माझी इच्छा नाही, पण शेवटी सत्य सर्वाना माहित आहे. सत्य लोकांसमोर आले आहे, असं फडणवीस म्हणाले.

देशमुख काय म्हणाले?
माझ्यावरील तीन वर्षापूर्वी परमवीर सिंह आणि वाझे याने माझ्यावर केलेल्या आरोपावर न्यायमुर्ती चांदीवाल यांनी 11 महिने चौकशी केली. या चौकशी दरम्यान, वाउझे यांनी उलट चौकशीत कोर्टात स्पष्ट केलं की, अनिल देशमुख किंवा त्यांच्य कोणत्याही पीएने मला पैसे मागितले नाहीत आणि मी त्यांना कधी पैसे दिले नाहीत. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी हा 1400 पानांचा अहवाल राज्य सरकारला दोन वर्षांपूर्वीच सादर केला आहे. परंतु, सरकार हा अहवाल सार्वजनिक करत नाही. फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर तीन वर्षांपूर्वी माझ्यावर झालेल्या आरोपांचा न्या. चांदीवाल यांच्या कोर्टाने सरकारकडे सादर केलेला चौकशी अहवाल सार्वजनिक करा, असं देशमुख म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube