Devendra Fadnavis : विरोधक तोंडाला पट्ट्या लावून बसले आहे. तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत. अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यवतमाळमध्ये (Yavatmal) बोलताना विरोधकांवर केली. ते आज यवतमाळमध्ये आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) मेळाव्यात बोलत होते.
बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेर्धात आज (24 ऑगस्ट) रोजी महाविकास आघाडीकडून (MVA) तोंडाला पट्ट्या लावून सरकार विरोधात संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येत आहे. यावरून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
या मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधक बदलापूरच्या घटनेनंतर आम्हाला लाडकी बहीण योजना नको सुरक्षा हवी, परंतु आम्ही सुरक्षा देऊ आणि लाडकी बहीण योजना देखील देऊ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही शाळेपासून संस्कार रुजवणार आहोत. जेव्हा त्यांची सरकार होती तेव्हा राज्यात किती घटना घडल्या, लॉकडाऊनच्या काळात राज्यात अशा किती घटना घडल्या याची देखील यावेळी फडणवीस यांनी विरोधकांना आठवण करून दिली. बदलापूर प्रकरणात आम्ही कडक कारवाई करत आहोत. असेही फडणवीस म्हणाले.
तसेच विरोधक संवेदनशील बाबींवर राजकारण करत आहे. काही लोकांना यातही मतांचा राजकारण करायचा आहे ते तोंडाला पट्ट्या लावून बसले आहे. माझी त्यांना विनंती आहे तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहे कारण तुम्ही समाजात अराजकता निर्माण करण्याचे करत आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर यावेळी बोलताना केली.
विरोधक सत्तेत आल्यानंतर सर्वात आधी लाडकी बहीण योजना बंद करणार. मोफत सिलेंडर योजना बदल करणार परंतु असे होणार नाही. आमच्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आम्हालाच असणार आहे त्यामुळे आमची पुन्हा एकदा सरकार येणार आहे असा विश्वास देखील यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
Jay Shah : जय शाहनंतर कोण होणार बीसीसीआय सचिव ? ‘या’ नावांची चर्चा
लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून विरोधक ही योजना बंद कशी करता येणार यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी ते उच्च न्यायालयात देखील गेले होते मात्र न्यायालयाने त्यांना चपराक लावली असेही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.