Devendra Fadnvis Speak on Udhav Thackerya : उद्धव ठाकरेंनी जम्बो कोविड सेंटर घोटाळा केलाय, तर त्यांना ‘कफनचोर’च म्हणावं लागणार असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे. दरम्यान, कोविड काळात जम्बो कोविड सेंटरमध्ये ठाकरेंनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्यावर आता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा ‘कफनचोर’ असा उल्लेख केल्याने नव्या वाकयुद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Baipan Bhari Deva Review: बाईच्या मनातला मनमोकळा संवाद…बाईपण जगण्याची धमाल गोष्ट
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी हाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल भाष्य केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडलेल्या घोटाळ्यांची सर्व माहिती चौकशी झाल्यानंतरच समोर येणार असल्याचा दावाही केला आहे. हा जनतेचा पैसा असून त्यांच्यावर आम्ही कारवाई करणारच, असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
पोलीस पाटील, कोतवाल पदभरती घोटाळ्याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यासह दोन बडे अधिकारी निलंबित
मुंबई महापालिकेत आम्ही ठाकरे गटाच्या शिवसेनेतून 2017 मध्येच बाहेर पडलो आहोत. ठाकरे गटाच्या गोरख-धंद्यात आम्ही त्यांना साथ देणार नाही. आम्ही राज्यात सोबत असतो तरी महानगरपालिकेमध्ये आम्ही विरोधात नसलो तरी त्यांच्यासोबतही नव्हतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
श्रीकांत शिंदेंसह शिवसेनेच्या खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार? फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं
कोविड काळातील घोटाळ्यात असे 35 डॉक्टर समोर आले आहेत, त्यांनी कोविड सेंटर मध्ये कामासाठी केवळ अर्ज केले होते. मात्र, सेवा दिली नाही. तरी देखील त्यांच्या नावाने पूर्ण बिल काढण्यात आले आहे. म्हणजेच कोविड सेंटरमध्ये कोण होते? असा प्रश्न उपस्थित होतो, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
https://www.youtube.com/watch?v=4kHPPxLzHfE
दरम्यान, सध्या राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना भ्रष्टाचारापासून मुक्त होण्याची अपेक्षा आहे. सर्वसामान्य नागरिकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थ असून मोदींच्या योजनेत भ्रष्टाचार होत नाही. म्हणूनच सर्वसामान्य नागरिक भाजपला पाठिंबा देत असल्याचा दावाही फडणवीसांनी यावेळी केला आहे.