पोलीस पाटील, कोतवाल पदभरती घोटाळ्याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यासह दोन बडे अधिकारी निलंबित

पोलीस पाटील, कोतवाल पदभरती घोटाळ्याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यासह दोन बडे अधिकारी निलंबित

भंडारा : जिल्ह्यातील भंडारा उपविभागातील भंडारा व पवनी तालुक्यातील पोलीस पाटील (Police Patil) व कोतवाल पदभरती (Kotwal Recruitment) प्रकरणात चौकशीत त्रृट्या आढळून आल्या. विभागीय आयुक्तांच्या सुचनेवरून भंडाराचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, (Ravindra Rathod) भंडारा तहसीलदार अरविंद हिंगे (Arvind Hinge) व पवनीचे तत्कालीन तहसीलदार निलिमा रंगारी (Nilima Rangari) यांना निलंबित करण्यात आले आहे. बुधवारी (२८ जून) ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Police Patil Kotwal recruitment scam two tehsildars and Sub Divisional Officer suspended suspended)

https://www.youtube.com/watch?v=fgNKR9V0d6M

पोलीस पाटील, कोतवाल पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध न करता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व उमेदवारांना बोलविण्यात आले होते. ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत जास्त गुण असूनसुद्धा त्यांची निवड न करता ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत कमी गुण असून त्यांच्याकडून आर्थिक देवाण-घेवाण करून मौखिक परीक्षेत जास्त गुण दिले होते, अशी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने केली होती. भंडारा जिल्ह्यातील कोतवाल व पोलीस पाटील पदभरती घोटाळा प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व पुन्हा नव्याने परीक्षा घेण्यात यावी या मागणीला घेऊन दि. ११ मे २०२३ ला जिल्हाधिकारी यांना ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष वैभव चोपकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. दि. १७ मे पासून ते ३० में पर्यंत उपविभागीय अधिकारी तुमसर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते.

अर्धसत्य तोंडावर आले, गुगली टाकून पूर्णसत्य बाहेर आणणार ! फडणवीसांचे शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर 

याचदरम्यान भंडारा, पवनी, साकोली, लाखनी तालुक्यातील कोतवाल भरती पार पडली व यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार परीक्षार्थी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनकडे घेऊन आले असता वैभव चोपकर यांच्या नेतृत्वाखाली दि. २९ में रोजी जिल्हाधिकारी यांची भेट देऊन सदर भरती रद्द करून फेर परिक्षा घेण्यात यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली होती, तेव्हा जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले व तुमसर येथे सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याची सूचना केली.

दरम्यान, प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, भंडारा यांनी प्राथमिक चौकशी केली. जिल्ह्यात पोलीस पाटील, कोतवाल पदभरतीत अनियमितता आढळल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी शासनास दिला. प्राप्त अहवालात प्रथमदर्शनी पोलीस पाटील व कोतवाल पदभरतीमध्ये अनियमितता आढळल्याने राज्य शासनाने तीन अधिकाऱ्यांना शासन सेवेतून निलंबित केले आहे.

पदभरती प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत त्रृट्या आढळून आल्या. विभागीय आयुक्तांच्या सूचनेवरून महसूल व वनविभागाचे अवर सचिव संजीव राणे यांच्या स्वाक्षरीचे दि. २८ जून रोजी निलंबनाचे आदेश काढण्यात आले. या आदेशात तत्कालीन भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, भंडाऱ्याचे तहसीलदार अरविंद हिंगे, पवनीचे तत्कालीन तहसीलदार निलीमा रंगारी यांना निलंबित करण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube