Download App

Chandrasekhar Bawankule : ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी फडणवीसांकडून बावनकुळेंचा बचाव

Devendra Fadnavis on Chandrasekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) अहमदनगर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यातील त्यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल (Viral audio clip) होत आहे. या कथित क्लिपमध्ये बावनकुळे यांनी पत्रकारांना धाब्यावर घेऊन जाण्याा सल्ला भाजप पदाधिकाऱ्यांना दिला होता. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांची पाठराखण करत बावनकुळेंच्या मनात असा कुठेही विषय नाही, असे सांगितले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतायत आणि त्याचा काय अर्थ निघतो या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तशा प्रकारचा वेगळा अर्थ काढण्याचे कारण नाही. अनेकवेळा कार्यकर्त्यांमध्ये असताना आपण व्यंगात्मक बोलतो, त्या गोष्टी वेगळ्या अर्थाने घ्यायच्या नसतात. बावनकुळेंच्या मनात असा कुठेही विषय नाही. त्यामुळे यावर वाद निर्माण करणे अतिशय चुकीचे आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळेंचा बचाव केला.

पत्रकारांना विकाऊ समजताय का? सुजय विखेंनी पत्रकारांची माफी मागावी;काँग्रेस आक्रमक

बावनुकळेंची सारवासारव
मी म्हटलं चुकीच्या बातम्या येऊ नये. बऱ्याचदा माहिती नसतांना पत्रकारांकडून बातम्या दिल्या जातात. तुम्ही निगेटिव्ह बातम्या छापा. पण त्यात आमचंही मत येऊ द्या. त्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद ठेऊन पक्षाची भूमिका सांगावी. आणि त्यात गैर काय आहे? नाहीतर एकतर्फी बातम्या छापल्या जातील. पक्षाविषयी चुकीच्या बातम्या छापल्या जाऊ नये, एवढाच माझ्या वक्तव्याचा हेतू होता. मात्र, त्याचा विपर्यास केला जातो, असं म्हणत बावनुकळेंनी सारवासारव केली.

Rohit Pawar : ‘बावनकुळेसाहेब …हा तुमचा समज’; ‘त्या’ विधानावर रोहित पवारांनीही सोडलं नाही…

बावनकुळे काय म्हणाले होते?
महाविजय 2024 पर्यंत बूथच्या संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत. ज्या बूथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत, हे पाहावं. बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत, त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंटवाले आणि इलेक्ट्रॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहासाठी बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे, समजलेच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झालं तर सुजय विखे आहेतच.

Tags

follow us

वेब स्टोरीज