Rohit Pawar : ‘बावनकुळेसाहेब …हा तुमचा समज’; ‘त्या’ विधानावर रोहित पवारांनीही सोडलं नाही…

Rohit Pawar : ‘बावनकुळेसाहेब …हा तुमचा समज’; ‘त्या’ विधानावर रोहित पवारांनीही सोडलं नाही…

Rohit Pawar On Chandrashekhar Bawankule : “बावनकुळेसाहेब…पत्रकार तुमच्या दबावाला, प्रलोभनांना बळी पडून तुम्हाला सोयीस्कर भूमिका घेतील हा तुमचा समज” असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी केली आहे. अहमदनगरमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान,
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी(Chandrashekhar Bawankule) पत्रकारांबद्दल भाष्य केलं होतं. त्यावर बोट ठेवत रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे.


आमदार रोहित पवार ट्विटमध्ये म्हणाले, “बावनकुळेसाहेब, ज्याप्रमाणे दिल्लीतले पत्रकार तुम्हाला सोयीस्कर भूमिका घेतात त्याप्रमाणे महाराष्ट्रातले पत्रकारही तुमच्या दबावाला, प्रलोभनांना बळी पडून तुम्हाला सोयीस्कर भूमिका घेतील हा तुमचा समज असेल तर मग तुम्हाला अजून महाराष्ट्र कळलेला दिसत नाही.

महाराष्ट्राचा स्वाभिमान कधीच दिल्लीसमोर झुकत नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही मांडलेली भूमिका मला पूर्णतः चुकीची वाटते, याबाबत मराठी पत्रकारही त्यांची भूमिका मांडलतीलच!” असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

कल्याण-डोंबिवली लोकसभेसाठी कोणाला पाठिंबा?; भाजप आमदाराने सांगूनच टाकलं

नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
हाविजय 2024 पर्यंत बूथच्या संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत, हे बघा. ज्या बूथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत, हे पाहावं. आपण एवढं चांगलं काम करतोय, पण हे असं काही टाकतात की जणू गावात बॉम्बच फुटला. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत, त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंटवाले आणि इलेक्ट्रॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहासाठी बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे, समजलेच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झालं तर सुजय विखे आहेतच, असं विधान बावनकुळेंनी केलं.

दरम्यान, बावनकुळेंनी पत्रकारांबद्दल केलेल्या विधानानंतर पत्रकारांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता राजकीय नेत्यांकडूनही बावनकुळेंच्या विधानाचा समाचार घेतला जात आहे. या विधानावरुन चुकीच्या बातम्या येऊ नये. बऱ्याचदा माहिती नसतांना पत्रकारांकडून बातम्या दिल्या जातात. तुम्ही निगेटिव्ह बातम्या छापा. पण त्यात आमचंही मत येऊ द्या. त्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद ठेऊन पक्षाची भूमिका सांगावी. आणि त्यात गैर काय आहे? नाहीतर एकतर्फी बातम्या छापल्या जातील. पक्षाविषयी चुकीच्या बातम्या छापल्या जाऊ नये, एवढाच माझ्या वक्तव्याचा हेतू होता. मात्र, त्याचा विपर्यास केला जातो, असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube