कल्याण-डोंबिवली लोकसभेसाठी कोणाला पाठिंबा?; भाजप आमदाराने सांगूनच टाकलं

कल्याण-डोंबिवली लोकसभेसाठी कोणाला पाठिंबा?; भाजप आमदाराने सांगूनच टाकलं

Ravindra Chavan : सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांच्या यांना चितपट करण्यासाठी विरोधकांकडून मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण(Ravindra Chavan) यांनी आपला कोणाला पाठिंबा असेल? याबाबत ठणकावूनच सांगितलं आहे.

Ajit Pawar : ‘पुढं अर्थखातं माझ्याकडे टिकेल की नाही..?’; अजित पवार असं का म्हणाले?

रविंद्र चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुकांना आम्ही भाजपचे सर्वच कार्यकर्ते सामोरं जात आहोत, त्यामुळे मतदारसंघातून एनडीचा पक्षाचाच खासदार निवडून येणार यात तिळमात्र, शंका नाही, शिवसेनेच्या शिंदे गटाशी भाजपशी युती आहे, त्यामुळे आम्ही लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांनाच पाठिंबा देणार असल्याचं रविंद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे.

नागालँडचे आमदार मुंबईत येणार; अजितदादांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय शक्तिप्रदर्शन

तसेच 2019 च्या निवडणुकीआधी आमचं ठरलं होतं की कल्याण डोंबिवली महापालिकेत वेगळं जरी लढलो तरी भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे सत्तेत राहणार. सत्तेत आल्यानंतर पहिला महापौर कोण, इतर पदे कोणाला असं सर्वच ठरलं होतं, त्यावेळी शेवटचे काही वर्ष भाजपचा महापौर राहणार असल्याचं सांगितलं होतं, त्यावेळी एकनाथ शिंदे यांचीही इच्छा होती की भाजपचा महापौर झाला पाहिजे, पण गेल्यावेळी देता आलं नाही, त्यामुळे आता यावेळी आम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे भाजपचा महापौर व्हावा, यासाठी विनंती करणार असल्याचं रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=3UoWv9XTJzE

दरम्यान, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष सक्रिय झाले आहेत. आत्तापर्यंत वाट्याला न आलेल्या जागांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. मिशन महाराष्ट्र अंतर्गत १६ जागांची निवड करत भाजपने येथे आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यात कल्याण लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता.

पतीचं निधन झालं, सासूनं घराबाहेर काढलं; पहिल्याच निवडणुकीत थेट पंतप्रधानांना आव्हान… मनेका गांधी कशा बनल्या सर्वात वरिष्ठ खासदार?

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी सक्रिय झाली असून कल्याण लोकसभा मतदारसंघावर विजय मिळविण्यासाठी आनंद परांजपे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तर कल्याण लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो अभेद्य राखण्यासाठी दोन्ही गट प्रयत्नशील आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube