पतीचं निधन झालं, सासूनं घराबाहेर काढलं; पहिल्याच निवडणुकीत थेट पंतप्रधानांना आव्हान… मनेका गांधी कशा बनल्या सर्वात वरिष्ठ खासदार?

पतीचं निधन झालं, सासूनं घराबाहेर काढलं; पहिल्याच निवडणुकीत थेट पंतप्रधानांना आव्हान… मनेका गांधी कशा बनल्या सर्वात वरिष्ठ खासदार?

वर्ष होतं 1982 चं. काँग्रेसचे युवा नेते असलेल्या संजय गांधी यांच्या अपघाती निधनातून गांधी कुटुंब सावरत होतं. ज्याप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरु यांचा वारसा इंदिरा गांधी पुढे घेऊन जात होत्या, त्याच प्रमाणे इंदिरा गांधी यांचा राजकीय वारसदार म्हणून संजय गांधी ओळखले जात होते. पण त्यांचेच अपघाती निधन झाल्यामुळे राजकारणात रस नसलेल्या राजीव गांधी यांना इंदिरा गांधी राजकीय दृष्ट्या पुढे घेऊन चालल्या होत्या. दुसऱ्या बाजूला संजय गांधी यांची पत्नी मनेका गांधींच्या राजकीय महत्वकांक्षा बळावत होत्या. पण सुनेला राजकारणात पडू नये अशी तंबीच इंदिरा गांधींनी दिली होती. मात्र मनेका गांधी यांना ही गोष्ट रूचली नाही. इंदिरा गांधींना त्यांनी आपली नाराजी बोलूनही दाखवली. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. (In the special session, Maneka Gandhi spoke as the senior most Lok Sabha member)

अखेरीस त्यावर्षीच्या मार्च महिन्यात सासू-सुनेत वादाच्या ठिणगीचे वनव्यात रुपांतर झाले. इंदिरा गांधी विदेश दौऱ्यावर गेल्या असताना मेनका गांधी यांनी लखनऊमध्ये आपल्या समर्थकांसह एक सभा घेतली. ज्यावरून इंदिरा गांधी प्रचंड नाराज झाल्या. ही सभा पक्षाविरोधी असल्याचं म्हंटलं गेलं. या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी इंदिरा गांधींनी मनेका गांधींना घरातून बाहेर काढलं आणि घराचे दरवाजे कायमचे बंद केले. पण यानंतरही मनेका गांधी थांबल्या नाहीत. 1984 साली त्यांनी पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. तिही थेट तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरोधात. त्या निवडणुकीत मनेका गांधींचा पराभव झाला, पण त्यानंतर पुढच्याच निवडणुकीत त्यांनी लोकसभा गाठली.

तब्बल 6500 हून अधिक ‘Super-Rich’ करणार भारताला ‘गुड-बाय’ : रिपोर्ट

कट टू 19 सप्टेंबर 2023.

संसदेचं विशेष अधिवेशन सुरु झालं होतं. जुन्या संसदेतून नवीन संसदेत जाण्यासाठी सर्व खासदार सज्ज होते. सरकारी कार्यक्रम सुरु होता. पंतप्रधान, लोकसभेचे गटनेते, राज्यसभेचे नेते अशा नेत्यांची भाषण झाली. त्यानंतर भाषणाचं आमंत्रण मिळालं थेट मनेका गांधी यांना. 17 व्या लोकसभेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून हा मान होता.त्यादिवशी मनेका यांच्या रुपाने एकाच महिलेला भाषणाची संधी मिळाली. या संधीचा पुरेपुर उपोयग करत अस्खलित इंग्रजीमध्ये, सर्व खासदार पंतप्रधान आणि बड्या नेत्यांपुढे त्याांनी अगदी आत्मविश्वासाने भाषण केलं. 4 दशकातील राजकारणाचा आणि 8 पंतप्रधानांसोबत काम केल्याच्या अनुभावाचा त्यांनी थोडक्यात पण वाखाणण्याजोगा आढावा घेतला. दोन पंतप्रधानांविरोधात बंडखोरी करुन, राजकारणात येऊन, दोनवेळा पराभूत होऊन, गांधी घराण्याचं कोणतही वयल पाठिशी नसताना त्यादिवशी मनेका गांधी यांनी सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून भाषण केलं. यामुळे मनेका गांधी यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता कायम राहते.

वयाच्या 32 व्या वर्षी पहिल्यांदा संसदेत प्रवेश करणाऱ्या मनेका गांधी या सध्याच्या सभागृहातील सर्वाधिक ज्येष्ठ नेत्या असून मागील 35 वर्षांपासून त्या लोकसभेच्या खासदार आहेत. त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनात एकूण 10 लोकसभा निवडणुका लढवल्यात. त्यापैकी 8 निवडणुकांत त्यांना विजय मिळाला तर दोन निवडणुकीत अपयश मिळालं. 1984 साली पहिला आणि 1991 साली दुसरा. यानंतर 1996 पासून त्या आजपर्यंतच्या सर्व लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत.

या दरम्यानच्या काळात त्यांनी अपक्ष, जनता दल असा प्रवास करत 2004 ला अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला. मनेका गांधींनी त्यांच्या राजकीय जीवनात खासदार म्हणून सात आणि तर एकूण 10 पंतप्रधानांचा कार्यकाळ जवळून पाहिला आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर, नरसिंगराव, एचडी देवेगौडा, अटल बिहारी वाजपेयी, इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी.

मनेका गांधी यांच्या व्यतिरिक्त माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन या सुद्धा आठ वेळेस निवडून आल्या होत्या. तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी आणि माजी केंद्रीय मंत्री पी.एम.सईद हे दहा वेळेस तर पश्चिम बंगाल मधून इंद्रजीत गुप्ता यांनी अकरा वेळेस खासदार होण्याचा इतिहास घडवलाय.

India Canada Row : भारताच्या एका निर्णयामुळे डळमळीत होऊ शकते कॅनडाची एजुकेशन इकोसिस्टम

1989 मध्ये पहिल्यांदा मंत्री झाल्यावर त्यांच्याकडे पर्यावरण राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, पशुसंवर्धन कार्यक्रम अंमलबजावणी, सांख्यिकी पशु निगा आणि महिला व बालविकास मंत्री या खात्यांची त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर 2014 मध्ये मोदींच्या मंत्रिमंडळात महिवा न बालकल्याण मंत्री या खात्याची जबाबदारी संभाळली.

पशु चळवळ कार्यकर्त्या –

राजकीय व्यक्तिमत्वासोबतचं मनेका गांधी या प्राणी हक्क कार्यकर्त्या आणि पर्यावरणवादी आहे. प्राणी हक्क आणि कल्याणासाठी असणारी भारतातील सगळ्यात मोठी संस्था पीपल फॉर अॅनिमल्स ची स्थापना मनेका गांधींनी 1992 मध्ये केली. याद्वारे बेघर कुत्र्यांच्या हत्तेबाबत जागरूकता आणण्यासाठी त्यांनी याचिका ही दाखल केल्यात.

1990 च्या दशकात डीडी नॅशनलवर प्रसारित होणारा पर्यावरणविषयक टॉक शो मनेकाज आर्कचे आयोजन केले होते. यापूर्वी त्यांनी हेड्स अँड टेल्स हा प्राणी हक्क कार्यक्रम होस्ट केला होता. कायदा आणि प्राणी कल्याण या क्षेत्रातील अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत.

2014-15 मध्ये मोदी सरकारने सुरू केलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेची जबाबदारी मनेका गांधी यांच्यावर होती. या योजनेअंतर्गत स्त्री भ्रूणहत्येची आकडेवारी कमी करत 2 वर्षातचं स्त्री भ्रूणहत्येचं देशातील चित्र बदलल. ही जबाबदारी म्हणजे माझ्यासाठी गर्व असल्याचं मनेका सांगतात.

मनेका जेव्हा महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री होत्या तेव्हा जुलै 2018 मध्ये लोकसभेत, देहविक्री करण्यासाठी महिलांवर दबाव आणणाऱ्या व्यक्तींवर खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा देणार विधेयक मंजुर करण्यात आलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube