कितीही मागा, सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जातयं? शिंदेंच्या मंत्र्यांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

Sanjay Shirsat Conterversial Statement on Government Hostel and Money : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सरकारमधील अनेक मंत्री विविध वादग्रस्त विधानांमुळे अडचणींमध्ये सापडत आहेत. यामध्येच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे आता आधीच पैशांच्या कथित बागेमुळे अडचणीत सापडलेले संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?
सामाजिक आणि न्याय मंत्री असलेले संजय शिरसाट हे अकोल्यातील सामाजिक न्यायभवनाच्या उद्घाटनासाठी गेले होते. त्यावेळी भाषणांमध्ये बोलताना त्यांनी एक विधान केले. ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो. शिरसाट म्हणाले की, सामाजिक न्यायभवनाच्या वसतिगृहासाठी तुम्ही पाच दहा किंवा पंधरा कोटी अशी कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे. आपल्या बापाचं काय जातंय? हे वक्तव्य त्यांच्यासह शिवसेना आणि सरकारसाठी अडचणीचे ठरणार एवढं नक्की.
नैसर्गिक वाळूला पर्याय एम सँड, युनिट सुरू करण्यासाठी अर्ज करा; वाचा सविस्तर माहिती
दुसरीकडे गेल्या दोन-तीन दिवसातच सरकारमधील विविध मंत्र्यांची वादग्रस्त विधानं, वादग्रस्त कृती यावरून सरकारच्या अडचणी वाढत असल्याने मंत्र्यांनी अशा प्रकारचे कुठलेही विधानं आणि कृती करू नये. अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. अन्यथा कारवाई केली जाईल .असं देखील खडसावण्यात आलं होतं. मात्र तरी देखील अशा प्रकारची विधानात थांबताना दिसत नाहीत.