Devendra Fadnavis : राज्यात एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) बंड यशस्वी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)पायउतार व्हावे लागलं होतं. यानंतर अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आणि एकेकाळी मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. दिल्लीतल्या नेत्यांनी फडणवीस यांचे पंख छाटल्याची चर्चा तेव्हा झाली. दरम्यान, आता खुद्द फडणवीसांनी या घटनेवर भाष्य करून केलं. (Devendra Fadnavis Disclosure senior leader was not ready to make Eknath Shind Chief Minister)
खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात फडणवीस यांनी काही खुलासे केलेत. आज फडणवीस यांनी या भागावर काही ट्वीट केल आहेत. त्यात फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची शिफारस कोणी केली यामागची स्टोरी सांगितली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव कोणी दिला? यावर फडणवीस यांनी मी आणि एकनाथ शिंदे भेटलो तेव्हा हे सरकार आपल्या विचारांना पटणारे नाही, असं एकमत झालं. मी ठरवलं होतं की, मी मुख्यमंत्री होणार नाही. सरकार बदलण्यावर चर्चा झाली, हिंदू आणि हिंदुत्वाचा दम घुटत होता. तेव्हा मी एकनाथ शिंदे हे एवढं मोठं पाऊल उचलत आहेत तर त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं, असं मत व्यक्त केलं. दिल्लीत जाऊन वरिष्ठांना या बाबत सांगितले. त्यांची समजूत काढण्यात बराच वेळ गेला. माझ्या पक्षाने माझा प्रस्ताव लगेच स्वीकारला नाही,असं फडणवीस यांनी सांगितलं.
अजित पवारांना ‘दादा’ नाव कसं पडलं? दादांनी रंगवूनच सांगितलं…
एकनाथ शिंदे एवढं मोठं पाऊल उचलणार आहेत, त्यांना मुख्यमंत्री बनवायला हवं, हे पक्षश्रेष्ठींना मान्य होतं. पण ते लोकांमध्ये विश्वास निर्माण करू शकतील का? या प्रश्नावर सगळं अडलं होतं. मात्र, काही दिवसांनी दिल्लीतील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास संमती दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
मला प्रदेशाध्यक्ष व्हायचे होते. वरिष्ठांशीही तशी चर्चा झाली होती. मी सरकारमध्ये राहणार नाही, असे सांगितलं होतं. प्रदेशाध्यक्ष बनून मी ती जबाबदारी पार पाडेन असं सांगितलं. कठोर परिश्रम घेऊन येत्या दोन वर्षांत पक्षाला पहिल्या क्रमांकावर नेईन, सर्व काही असं ठरलं. पण ऐनवेळी मला उपमुख्यमंत्री करण्यात आल्याने मला धक्का बसला, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांनी सांगितलं की, तेव्हा फक्त शिंदे आणि मला, आणि आमच्याशिवाय वरील तीन नेत्यांना याची माहिती होती. शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, असे पत्र राज्यपालांना दिल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटले. मी त्यांना असचं ठरलं असल्याचं सांगितलं. यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन घेऊन शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. तेव्हा माझ्या चेहऱ्यावर कसलीही चिंता किंवा दुःख नव्हते. तर विजयाचा आनंद होता, पण तो फार काळ टिकू शकला नाही, असेही फडणवीस म्हणाले.