‘ते’ अजूनही पोरकट, फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्याची शरद पवारांनी उडवली खिल्ली

Sharad Pawar on Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाघाप्रमाणे आहेत. कितीही जनावरं एकत्र आली तरीही ते वाघाची शिकार करु शकत नाहीत. मोदी वाघाप्रमाणे आहेत त्यांच्याविरोधात विरोधक कितीही एकत्र आले तरीही ते मोदींसारख्या वाघाची शिकार करु शकणार नाहीत. असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांची […]

UPSC Exam (4)

UPSC Exam (4)

Sharad Pawar on Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाघाप्रमाणे आहेत. कितीही जनावरं एकत्र आली तरीही ते वाघाची शिकार करु शकत नाहीत. मोदी वाघाप्रमाणे आहेत त्यांच्याविरोधात विरोधक कितीही एकत्र आले तरीही ते मोदींसारख्या वाघाची शिकार करु शकणार नाहीत. असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली आहे.

शरद पवार म्हणाले की राजकारणात अजूनही पोरकट वक्तव्य करणारा एक वर्ग आहे त्यामुळे चाईलडिश चे वक्तव्य करतात त्यावर काय बोलायचं? असं विचारत शरद पवार यांनी फडणवीसांच्या त्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केंद्रीय पातळीवरुन विरोधकांनी मोट बांधायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितिश कुमार यांनी विरोधकांच्या ऐक्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या नेत्यांच्या बैठकाही पार पडल्या असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी पटना येथे देशातील प्रमुख विरोधी नेत्यांची मुख्य बैठक होणार आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.

‘औरंगजेबाचे महिमामंडन का करता? बाळासाहेब तुमच्याकडून अपेक्षा नव्हती’

देशात मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. ते पाटण्याला रॅली करणार आहेत. फ्लॅशबॅकमध्ये तुम्ही गेलात तर अशीच रॅली 2019 मध्येही झाली होती. हातात हात घालून फोटो काढले होते. मंचावर जेवढे नेते होते तेवढ्याही जागा लोकसभेच्या काँग्रेसच्या निवडून आल्या नाहीत. मंचावर 55 लोक होते आणि काँग्रेसच्या 48 जागा निवडून आल्या होत्या, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

‘स्टंटबाजी करू नका’; श्रीरामपूर बंद ठेवणाऱ्यांना राधाकृष्ण विखेंनी सुनावले !

आशिष देशमुख यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी त्यांनी मोदींची तुलना वाघाशी केली. वाघाविरोधात कितीही प्राणी एक झाले तरीही ते वाघाची शिकार करु शकत नाहीत असं त्यांनी म्हटलं होतं.

Exit mobile version