‘औरंगजेबाचे महिमामंडन का करता? बाळासाहेब तुमच्याकडून अपेक्षा नव्हती’

‘औरंगजेबाचे महिमामंडन का करता? बाळासाहेब तुमच्याकडून अपेक्षा नव्हती’

Devendra Fadnavis on Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देशातील राष्ट्रप्रेमी मुसलमान देखील औरंगजेबाला कधीही मान्यता देत नाही. बाळासाहेब तुम्ही त्या ठिकाणी जाऊन औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन करता? किमान तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीय, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची युती आहे. आता हे उद्धव ठाकरेंना मान्य आहे का, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की काही लोक सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. जे संभाजीनगरला घडलंय, जे अकोल्याला घडलंय, जे कोल्हापूरला घडलंय हे योगायोग नाहीय. हा एक प्रयोग आहे. काही लोक प्रयोग करुन अशांतता झाली पाहिजे असा प्रयत्न करत आहेत. काही लोक अचानकपणे औरंगजेबाचा स्टेट्स कसे ठेवायला लागले? अचानक औरंग्याच्या औलादी कशा पैदा झाल्या? ह्या औरंग्याच्या औलादी कोणीतरी पैदा करतंय कारण महाराष्ट्रातील शांतता त्यांना नको आहे. महाराष्ट्राचा विकास नको आहे. त्यामुळे काही लोकांना मळमळ होतीय, जळजळ होतीय. त्यामुळे काही लोक इथं अशांतता तयार करत आहेत, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

शरद पवारांच्या आत्मचरित्राचा दाखला देत, फडणवीसांचा घरी बसणाऱ्या उद्धव ठाकरेंना टोला

मला एका गोष्टीचे दु:ख आहे की आमचे बाळासाहेब आंबेडकर देखील औरंगजेबाच्या कबरीवर गेले. बाळासाहेब तुमचे आणि आमचे विचार वेगळे असतील पण तुमच्याकडे पाहात असताना आम्हाला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हैद्राबादच्या निजामाने मोठ्या प्रमाणात अमिष दिली होती की तुम्ही बुद्ध धर्म स्विकारू नका. तुम्ही आमच्यासोबत सामील व्हा. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की मी तोच धर्म स्विकारील जो भारताच्या भूमीत तयार झालेला असेल आणि बुद्ध धर्म स्विकारण्याचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तुम्ही तर औरंगजेबाच्या दरबारात… वाद निर्माण करणाऱ्यांना प्रकाश आंबेडकरांनी फटकारलं…

आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही आहोत. पण औरंगजेब हा आमचा नेता कसा होऊ शकतो? तो आमचा राजा कसा होऊ शकतो? आमचा राजा फक्त एकच आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. यांच्याशिवाय आमचा कोणताही राजा होऊ शकत नाही. भारतातील मुसलमान हे औरंगजेबाचे वंशज नाहीत. त्यामुळे या देशातील राष्ट्रवादी मुसलमान, राष्ट्रप्रेमी मुसलमान आहे तो औरंगजेबाला कधीही मान्यता देत नाही. तोही छत्रपती शिवरायांना मानतो आणि आज बाळासाहेब तुम्ही त्या ठिकाणी जाऊन औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन करता? किमान तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीय, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube