शरद पवारांच्या आत्मचरित्राचा दाखला देत, फडणवीसांचा घरी बसणाऱ्या उद्धव ठाकरेंना टोला

  • Written By: Published:
शरद पवारांच्या आत्मचरित्राचा दाखला देत, फडणवीसांचा घरी बसणाऱ्या उद्धव ठाकरेंना टोला

किती ही वेली एकत्र आल्या तरी वटवृक्ष होऊ शकत नाही, वटवृक्ष तो एकच असतो वेली त्या वटवृक्षाचं काहीच वाकडं करू शकत नाही. असा टोला यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला. आमचं सरकार काम करतंय मागचं सरकार घरी बसणार सरकार होत. यावेळी फडणवीसांनी शरद पवारांच्या आत्मचरित्राचा दाखला दिला. स्वतः शरद पवार त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षात फक्त दोनच दिवस मंत्रालयात गेले. त्यामुळे आमच्या सरकारचे नुकसान झाले. तसेच पुढे शरद पवार म्हणतात उद्धव ठाकरेंची राजकीय समज थोडी कमी आहे म्हणून चाळीस लोक निघून गेले. असे मी नाही शरद पवार म्हणाले असे फडणवीस म्हणतात. ते आज अकोल्यातील मोदी @ ९ महासंपर्क सभेत बोलत होते.( Devendra Fadnavis criticizes On Uddhav Thackeray)

सध्या देशात आणि राज्यात जे सरकार आहे ते जनसामान्यांसाठी काम करत आहे. परंतु काही लोक या सरकारला पाडण्याचा प्रेयत्न करत आहेत. जे अहमदनगरला, अकोल्याला, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरला घडलय हा योगा योग्य नसून हा एक प्रयोग असून काही लोक मुदाम हे घडवत आहेत. आणि राज्यात अशांतता प्रस्थापित करण्याचा प्रेयत्न करत आहेत. म्हणून मी सवाल केला अचानक काही लोक औरंगजेबाचं स्टेटस ठेवायला लागले. अचानक औरंग्याच्या अवलादी अचानक कशा पैदा झाल्या. ह्या औरंग्याच्या अवलादी कोणीतरी पैदा करत आहे.

उद्धवजी, तुम्हाला आता कुठं कुठं आग होतेय; फडणवीसांचा पलटवार

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब आंबेडकरांवर निशाणा साधला ते म्हणाले मला अतिशय दुःख होतंय की बाळासाहेब औरंगजेबाच्या कबरीवर गेले. बाळासाहेब तुमचे आमचे विचार वेगळे असतील पण तुमच्याकडे पाहत असताना आम्हाला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. बाबासाहेबांना हैदराबादच्या निजामाने आमिषदिली होती तुम्ही बुद्ध धर्म स्वीकारू नका तुम्ही आमच्या बरोबर या त्यावेळी बाबासाहेब म्हणाले मी तोच धर्म स्वीकारेल जो यादेशाचा आहे.

अरे हा औरंगजेब आमचं राजा कसा होऊ शकतो आमचा राजा एकच ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवाय आमचा दुसरा राजा होऊ शकत नाही. माझा सवाल आहे देशातील जे मुस्लिम आहेत ते औरंजेबाचे वंशज नाहीत. या देशातील जो राष्ट्रवादी विचाराचा मुसलमान आहे तो पण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आहे. म्हणून माझा बाळासाहेबांना सवाल आहे तुम्ही का त्या औरंजेबाच्या कबरीवर गेले. तेथे ते म्हणाले औरंजेबाने देखील या देशावर राज्य केले. मग माझं त्यांना सांगणं आहे की हिटलरने देखील जर्मनीवर राज्य केलं पण आज त्याचा कबरीवर कुत्रा देखील मुतायला जात नाही मग तुम्ही जा घेलात.

 

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube