Download App

राष्ट्रवादीबरोबर आमची राजकीय मैत्री, पुढच्या १०-१५ वर्षांत…; फडणवीस आता स्पष्टच बोलले

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. यामुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अजित पवार गटाने पक्षावरही दावा केला. त्यामुळं शरद पवार गटाकडून सातत्याने अजित पवार आणि भाजपवर टीका केली जाते. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीविषयी भाष्य केलं. राष्ट्रवादीबरोबर (NCP)आमची राजकीय मैत्री असल्याचं विधान त्यांनी केलं. (Devendra Fadnavis on NCP and Shivsena political friendship with NCP)

आगामी वर्ष हे निवडणुकाचं वर्ष आहे. २०२४ मध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली. आज भाजपच्या ‘महाविजय अभियान 2024’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत राज्यभरातील अनेक दिग्गज नेते आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यशाळेला संबोधित केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, विरोधकांकडून भाजपवर फोडाफोडीचं राजकारण केल्याचं आरोप होतात. मात्र, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे काही छोटे नेते नाहीत. ते काही काल परवा राजकारणात आले नाहीत. मी काही मोहिनी टाकली आणि ते युतीत आले, असं नाही. ते विचार करून  भाजपसोबत आल्याचं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवरही टीका केली. ज्या ज्या वेळी अन्याय होईल, त्या-त्या वेळी एकनाथ शिंदे जन्माला येतील, असा इशारा त्यांनी दिला.

समितीसाठी भांडले पण, ऐनवेळी नावच गायब; ऊस दर नियंत्रण समितीतून राजू शेट्टींना डच्चू! 

ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची आमची जी युती झाली, ती ईमोशनल युती आहे. मूळ शिवसेनेसोबत आमची २५ वर्षाची मैत्री आहे. त्याच शिवसेनेशी आम्ही पुन्हा युती केली. मधल्या काळात आमच्या युतीत वादळं आले असतील, नेत्यांमध्येही मतभेद झाले असतील, पण आमची इमोशनल मैत्री आहे. त्यामुळं आम्ही पुन्हा एक झालो. तर राष्ट्रवादीबरोबर काल-परवा जी युती भाजपने केली. ती आमची राजकीय मैत्री आहे. कदाचित पुढच्या दहा-पंधरा वर्षांत राष्ट्रवादीबरोबरची युतीही आमची इमोशनल मैत्री होईल, असं सूचक विधान फडणवीस यांनी केलं.

भाजपने आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादीत फुट पाडली. त्यामुळं भाजपवर घरं फोडल्याचा आरोप केला जातोय. यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. विरोधक म्हणतात, तुम्ही दोन-दोन पक्ष फोडले, तुम्ही घर फोडली. पण, याची सुरूवात कोणी केली? 2019 मध्ये जनादेशाची हत्या करण्याचं काम कोणी केलं? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.

Tags

follow us