Download App

आरक्षणाचा ‘मास्टर प्लान’ राहुल गांधींनी फोडताच फडणवीस अ‍ॅक्टिव्ह; म्हणाले, अमेरिकेतून…

  • Written By: Last Updated:

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येताच पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल गांधींनी आरक्षण संपवणारी योजना अमेरिकेतून उघड केल्याचे म्हणत त्यांचा खरपून समाचार घेतला आहे. (Devendra Fadnavis On Rahul Gandhi Statement Over Reservation)

फडणवीसांकडून राहुल गांधींचा समाचार

राहुल गांधींनी केलेल्या विधानानंतर यावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या स्टाईलने राहुल गांधींनी समाचार घेतला आहे. याबाबत त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे.

फडणवीसांनी केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की, राहुल गांधी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नेहमीच देशविरोधी वक्तव्ये केली आहेत, जी कोणत्याही प्रकारे राष्ट्रहिताच्या दृष्टीने नाहीत. आरक्षण संपवण्याबाबत राहुल गांधी यांनी नुकतेच केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात राहुल गांधी आणि काँग्रेसने आरक्षणाबाबत खोटी कथा पसरवली पण आता त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे असेही फडणवीसांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

शरद पवारांच्या मोदींसमोर तीन मोठ्या अटी; म्हणाले, माझ्या गाडीत…

आरक्षण कोणीही संपवू शकणार नाही

पुढे फडणवीसांनी राहुल गांधींनी कोणत्याही व्यासपीठावर जाऊन आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला तरीही देशातील प्रत्येक वर्गाला त्यांचे हक्क मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. एवढेच नव्हे तर, राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही असेही फडणवीसांनी म्हटले आहे.

follow us