Download App

दाऊदच्या हस्तकासोबत ठाकरेंचा शिलेदार; राणेंचे आरोप अन् फडणवीसांनी घोषित केली SIT

Maharashtra Winter Session : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सातवा (Maharashtra Winter Session) दिवस आहे. आज विधिमंडळात भाजप आमदार नितेश राणे यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता आणि ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा गंभीर आरोप केला. इतकेच नाही तर त्यांनी सभागृहात या पार्टीचा फोटो दाखवत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. भाजप आमदार आशिष शेलार, मंत्री दादा भुसे यांनीही या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय गंभीर असल्याचे सांगत या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले.

राणे म्हणाले, दाऊदच्या जवळचा मुख्य आरोपी 1993 च्या ब्लास्टचा आरोपी हा जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. पॅरोलच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाच्या नेत्याबरोबर पार्टी करतोय. त्याचे व्हिडिओही आमच्याकडे आहेत. 1993 च्या बॉम्ब ब्लास्टमध्ये अनेक निरपराध लोकांचा बळी गेला. यातील आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर तो पार्टी करतो. ठाकरे गटाचा नाशिक महानगर अध्यक्ष सुधाकर बडगुजर याच्यासोबत पार्टी करतो. हा प्रकार खूप गंभीर आहे. याला कुणाचा पाठिंबा आहे असा सवाल करत या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आमदार राणे यांनी केली.

Devendra Fadnavis : ऑनलाइन फ्रॉड हाणून पाडणार; फडणवीसांनी सांगितलं सरकारचं प्लॅनिंग !

त्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार आणि मंत्री दादा भुसे यांनीही हा प्रकार गंभीर असल्याचे स्पष्ट करत चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर फडणवीस म्हणाले, हा विषय अतिशय गंभीर आहे. बॉम्बस्फोटात जे आरोपी आहेत. विशेषतः या स्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्या जवळचा जो कुत्ता आहे याच्यासोबत त्या ठिकाणी पार्टी करणं. खरं म्हणजे हा पेरोलवर बाहेर होता. पॅरोलवर बाहेर असताना पार्टी देखील करता येत नाही. त्यानं पार्टी करायची आणि कुणीतरी त्या पार्टीत जाऊन नाचायचं हे अतिशय गंभीर आहे. या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे देखील तपासण्यात येईल. अशा प्रकारच्या पार्टीत कोण कोण होते. त्याला कुणाचा वरदहस्त होता का, हे देखील तपासण्यात येईल.

बॉम्बस्फोटातल्या आरोपीसोबत जर कुणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत. त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. यावेळी सत्ताधारी गटाच्या आमदारांनी बाके वाजवत या निर्णयाचे स्वागत केले.

ललित पाटीलच्या ‘त्या’ शब्दांवर रोहित पवारांंनी घेरलं; फडणवीसांनी एकाच वाक्यात विषय संपवला

Tags

follow us