ललित पाटीलच्या ‘त्या’ शब्दांवर रोहित पवारांंनी घेरलं; फडणवीसांनी एकाच वाक्यात विषय संपवला

ललित पाटीलच्या ‘त्या’ शब्दांवर रोहित पवारांंनी घेरलं; फडणवीसांनी एकाच वाक्यात विषय संपवला

Devendra Fadnavis : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा (Maharashtra Winter Session) सातवा दिवस आहे. आज अधिवेशनात विरोधकांनी ललित पाटील प्रकरणासह राज्यातील (Lalit Patil Case) ड्रग्स संदर्भात राज्य सरकारला घेरले.  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ललित पाटीलसह राज्यातील ड्रग्सवर काय कारवाई केली असा प्रश्न विचारला. ललित पाटीलला ज्यावेळी अटक करण्यात आली तेव्हा ‘मी पळून गेलो नव्हतो तर मला पोलिसांनी पळवून लावलं होतं’, असे तो म्हणाला होता. हे नेमकं काय आहे? यावर स्पष्टीकरण देण्याचीही मागणी आमदार पवार यांनी केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एकाच वाक्यात उत्तर देत हा मुद्दाच निकाली काढला.

आमदार रोहित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ड्रग्सवर कारवाई करण्याच्या उद्देशाने  अँटी नार्कोटिक टास्क फोर्स स्थापन केला आहे. राज्यातील सगळ्याच पोलीस स्टेशनमध्ये हा फोर्स सुरू करणार आहोत. केंद्रानेही यासंदर्भात बैठक घेतली होती. ड्रग्स विरोधात एकत्रित लढण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. तीनशे कोटींचंच नाही तर मोठ्या प्रमाणात कारवाई करून ड्रग्स पकडण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी कोणताही गाजावााजा न करता अशा 2200 टपऱ्यांवर कारवाई केली. त्यांचं अतिक्रमणही काढून टाकलं, असे फडणवीस म्हणाले.

Nitesh Rane : ‘उद्धव ठाकरेंनीच काढली राणे साहेबांची खुर्ची’; नितेश राणेंनी ‘इतिहास’च सांगितला

या कारवाईत एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बंद कारखान्यात रसायनांचा वापर करून ड्रग्स तयार केलं जात आहे. त्यामुळे या कारखान्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच रसायनांच्या आयातीवर लक्ष ठेवण्याचे काम सरकारकडून केले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

ललित पाटील प्रकरणात अतिशय कडक कारवाई करण्यात आली आहे. एखादा आरोपी काय बोलतो याची काही विश्वासार्हता नसते. पण आपण कारवाई करत चार पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. ड्रग्सशी संबंधित जर कोणत्याही पोलिसाचा थेट सहभाग आढळून आला तर त्याला निलंबित न करता थेट डिसमीस केलं जाईल अशी घोषणा मी स्वतः केली होती. त्यानुसारच ही पहिली कारवाई आपण केली आहे.

सहायक पोलीस निरीक्षकावर कारवाई केली. आणखी दहा लोकांवर कारवाई केली. अधिष्ठात्यांना काढून टाकलं आहे. त्यांचा जर क्रिमिनल अँगल असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. तिथले जे दुसरे डॉक्टर होते त्यांनाही आपण अटक केली आहे. या संदर्भात आपण सगळी कारवाई केली आहे, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Lalit Patil Drugs Case : नाशिकच्या गिरणा नदीत सापडलं कोट्यावधींचं ड्रग्ज! मध्यरात्री पोलिसांची शोधमोहिम

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube