Download App

‘राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सह्या केल्या अन्’.. फडणवीसांनी फोडलं मोठं गुपित!

Sharad Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. 2019 मध्ये भाजपसोबत जाण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) नेमकं काय घडलं होतं याचं उत्तर फडणवीस यांनी दिलं. फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना स्पष्ट शब्दांत उत्तरे दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांच्या भाजपबरोबर जाण्याच्या निर्णयावर जे वक्तव्य केले होते त्यावरही प्रतिक्रिया दिली.

2019 मध्ये शरद पवार तपास यंत्रणांना घाबरले होते का

फडणवीस म्हणाले, माझं एवढंच म्हणणं आहे की 2019 ला शरद पवार साहेबांनी आमच्याशी चर्चा केली होती आणि ते आमच्यासोबत यायला तयार होते. तर मग ते कोणत्या एजन्सीला घाबरून आमच्याबरोबर येत होते का? याआधी 2017 मध्ये देखील त्यांनी आमच्याशी चर्चा केली होती. त्यावेळीही ते कुठल्या एजन्सीला घाबरून येत होते का?, तेव्हा मला असं वाटतं की पवार साहेबांना हे चांगलं माहित आहे की त्यांच्या पक्षातील लोकं का बाहेर पडले.

Devendra Fadnavis : अजितदादा मुख्यमंत्री होणार? फडणवीस म्हणाले, आमच्या शुभेच्छा पण…

शरद पवारांच्या मान्यतेने आमदारांनी सह्या केल्या

ते पुढे म्हणाले, पवार साहेबांना चांगलं माहित आहे की त्यांच्या पक्षातले लोक बाहेर का पडले. खरं म्हणजे, अजितदादांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की जेव्हा सरकार बदललं तेव्हा पवार साहेबांच्या मान्यतेने राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सह्या करून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मला वाटंत की आता हे सगळे लोक सोडून गेल्यानंतर त्यांच्यावर आरोप करणं चुकीचं आहे.

लोकं बाहेर का पडली हे पवार साहेबांना ठाऊक

माझं एवढंच म्हणणं आहे की 2019 ला शरद पवार साहेबांनी आमच्याशी चर्चा केली होती आणि ते आमच्यासोबत यायला तयार होते. तर मग ते कोणत्या एजन्सीला घाबरून आमच्याबरोबर येत होते का? याआधी 2017 मध्ये देखील त्यांनी आमच्याशी चर्चा केली होती. त्यावेळीही ते कुठल्या एजन्सीला घाबरून येत होते का?, तेव्हा मला असं वाटतं की पवार साहेबांना हे चांगलं माहित आहे की त्यांच्या पक्षातील लोकं का बाहेर पडले.

भाजपने गमावला आणखी एक मित्र; मोदी-शाहंची ‘दक्षिण दिग्विजय’ मोहीम स्वप्नवतच राहणार?

Tags

follow us