Download App

पक्ष कमजोर झाली की शरद पवार कॉंग्रेससोबत जातात; देवेंद्र फडणवीसांचा टोला

जेव्हा पवारांचा पक्ष कमकुवत होतो तेव्हा ते कॉंग्रेसमध्ये विलीन होतात, आपली पोझिशन नीट करतात आणि पुन्हा बाहेर पडतात - फडणवीस

Devendra Fadnavis on Sharad Pawar : देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) धामधूम सुरू असतांना शरद पवारांनी (Sharad Pawar) दोन दिवसांपूर्वी मोठं वक्तव्य केलं होतं. येत्या काळात अनेक छोटे-मोठे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य पवारांनी केलं होतं. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाष्य केलं.

फडणवीसांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, आमच्यासाठी निवडणूक जेवढी तुम्हाला अवघड दिसते, तेवढी आम्हाला अजिबात अवघड नाही. ठाकरे-पवार हे नरेटिव्ह सेट करत आहेत. महागाई, गद्दारी नॅरेटिव्ह तयार करून निवडणुका जिंकता येत नसतात. आम्ही विकासवर बोलता. पण, विरोधक एक टक्काही विकासावर बोलत नाहीत. ते फक्त गद्दार अशी टीका करत राहतात. कारण,विरोधकांना माहित आहे निवडणूक विकासावर किंवा मोदीजींवर गेली तर आपला पराभव निश्चित आहे, असं फडणवीस म्हणाले.

राज ठाकरे पुन्हा चर्चेत, भर सभेत म्हणाले, मी आज फतवा काढतो अन् … 

पवारांच्या विलीनकरणाच्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, पवारांची राजकीय करकीर्द पाहिली तर लक्षात येईल की, जेव्हा जेव्हा आपला पक्ष कमजोर होतोय, अडचणीत येतोय, तेव्हा पवार आपला पक्ष कॉंग्रेससोबत गेले. आपला पक्ष त्यांनी यापूर्वी अनेकदा कॉंग्रेसमध्ये विलीन केला. 1977 पासून आजपर्यंत आपण पाहिले असेल की, जेव्हा त्यांचा पक्ष कमकुवत होतो तेव्हा ते कॉंग्रेसमध्ये विलीन होतात, आपली पोझिशन नीट करतात आणि पुन्हा बाहेर पडतात, असं फडणवीस म्हणाले.

सुरेश जैन यांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र! घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

निवडणुकीत मोदींचा विजय होऊ नये म्हणून विरोधक टीका करतात. मोदींना शिव्या देणं हीच विरोधकांची भूमिका आहे. विरोधक पाकिस्तानची भाषा बोलत आहे. विरोधी पक्ष म्हणून ते आपली भूमिका निभावतांना कमी पडतात, अशी टीकाही फडणवीसांनी विरोधकांवर केली.

शरद पवार काय म्हणाले?
इंडियन एक्सप्रेसशी बोलतांना शरद पवार म्हणाले, आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक समन्वय राखून काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचं हित लक्षात घेऊन कॉंग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज पवारांनी वर्तवला. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लागू होईल का, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. यावर पवारांनी सांगितले की, मला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत कोणताही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारसरणी मानणारे आहोत, असं पवार म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज