Download App

भाजप-अजितदादा गटात ठिणगी! पडळकरांवर कारवाईसाठी सुनिल तटकरे फडणवीसांनी भेटणार

गोपीचंद पडळकरांचं(Gopichand Padakar) वक्तव्य विकृत मनोवृत्तीचं द्योतक असून त्यांच्यावर कारवाईसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांची भेट घेणार असल्याचं अजित पवार(Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरेंनी(Sunil Tatkare) स्पष्ट केलं आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यंत्री अजित पवार आणि यांच्यावर खालच्या पातळीवर विधान केल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचे पिल्लू, गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान

खासदार सुनिल तटकरे म्हणाले, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य विकृत मनोवृत्तीचं द्योतक आहे. अशा प्रकारचं वक्तव्य महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही, त्यामुळे भाजपने अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी सुनिल तटकरेंनी केली आहे.

IDBI बँकेत नोकरीची उत्तम संधी! कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापकाच्या 600 रिक्त पदांसाठी भरती, ‘या’ तारखेपूर्वी अर्ज करा

गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहे, अशा विकृत लोकांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं सुनिल तटकरेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

सोलापूरसाठी प्रणितीच योग्य उमेदवार, हायकमांडकडे शब्द टाकणार : लोकसभेसाठी सुशीलकुमार शिंदेंची फिल्डिंग

काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचा एक मोठा गट सामिल झाला आहे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सत्ताधारी समर्थन दिल्यानंतर लगेचच अजित पवारांसह समर्थक आमदारांची मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या राज्यात शिंदे गट, भाजप, आणि अजित पवार गटाने सत्ता स्थापन केली असून त्यामध्ये आता गोपीचंद पडळकरांनी वादाची काडी टाकल्याचं दिसून येत आहे.

धनगर आरक्षणाप्रश्नी छ. संभाजीनगरमध्ये खलबतं, राम शिंदेंनी वेधलं सरकारचं लक्ष, मंत्री गिरीश महाजन लवकरच….

काय म्हणाले होते पडळकर?
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लबाड लांडग्याचं पिल्लू आहे, त्यामुळे ते धनगर समाजाची आरक्षणाची मागणी मान्य करणार नसल्याचं विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं.

विशेष अधिवेशनात येणार ‘निवडणूक आयुक्त’ विधेयक; मंजुरीनंतर ‘आयोगात’ होणार मोठा बदल

दरम्यान, महाराष्ट्राची एक परंपरा आहे, राजकीय परिस्थिती, वैचारिक भूमिकेवरुन टीका-टीप्पणी केली जाऊ शकते, पण अशा अश्लाघ्य शब्दांत टीका करण्याच जो प्रसंग गोपीचंद पडळकरांनी केला आहे, त्याचा धिक्कार आणि निषेधार्थ असल्याचंही सुनिल तटकरे म्हणाले आहेत.

आता गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पडळकरांवर कारवाईची मागणी झाल्यास फडणवीस नेमकी काय भूमिका घेतील? गोपीचंद पडळकरांवर कारवाई करतील का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us