Download App

Devendrs Fadanvis : ‘पोपट आता मेलाय…’ 16 आमदारांच्या अपात्रतेवर फडणवीसांचं मोठं विधान

Devendrs Fadanvis on Mla of shinde Group : महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेल्या सत्तासंघर्षाची सुनावणीचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला आहे. यामध्ये राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांच्या कामावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारवर याचा काही फारसा परिणाम झाला नाही.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय घेण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्षांना दिल्या आहेत. याबाबतचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे. त्यामुळे या आमदारांबाबत नार्वेकर काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी करत महाविकास आघाडीला डिवचले आहे. त्यांनी काल (ता.15 मे) पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.

Devendra Fadanvis : इच्छुकांनो लागा तयारीला… ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणूका होणार… फडणवीसांनी दिले संकेत

फडणवीस म्हणाले, “16 आमदारांच्या अपात्रतेबाबत मी काहीच बोलू शकत नाही. हे संपूर्ण प्रकरण अध्यक्षांकडे आहे. त्यांच्याकडे त्याची सुनावणी होणार आहे. जो काही निर्णय द्यायचा आहे तो निर्णय विधानसभा देतील. एक अभ्यासक म्हणून, एक वकील म्हणून आणि 25 वर्ष विधानसभेत काम केले आहे म्हणून सांगतो, मला असे वाटते की आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पुरत समजले आहे की महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे. पण आपल्या कार्यकर्त्यांना पोपट जिवंत आहे, तरीही तो मान हलवतो आहे, त्याचे हातपाय हलताहेत हा संदेश देण्यासाठी महायुगास आघाडीचे नेत्यांना बोलावं लागतं.” ,अशा शब्दात फडणवीसांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंना डिवचले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार का? या माध्यम प्रतिनिधीच्या प्रश्नावर बोलताना फडणीस म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील याची कुठलीही शक्यता नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात लोकसभा निवडणुका आम्ही संपूर्ण ताकदीने जिंकू आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागून त्याही जिंकू, या दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची कुठलीही शक्यता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

वारकऱ्यांसाठी गुड न्यूज! आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी धावणार 5 हजार बस

पुढे महाविकास आघाडी पुन्हा एकदा वज्रमूठ सभा प्रारंभ करणार असल्याच्या बाबतीत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, वज्रमुठीला आधीच तडे गेले आहेत. कुणी कुठे उभे रहायचे, कुणी कुठे बसायचे यावर अधिक चर्चा सुरू आहेत. या नेत्यांबद्दल शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात विस्तृतपणे लिहिले आहे. त्यामुळे आम्ही विरोधक आहोत त्याबद्दल बोलण्याची गरज नाही.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या आगामी दौऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले, बारामतीवर तुमचे लक्ष अधिक असते, त्यामुळे तेथील केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी तुम्हाला दिसतात. पण अन्यही 48 लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री येतात, दोन दिवस थांबतात आणि तेथील तयारीचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधतात, असे म्हणत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.

आज UGC ची नवी वेबसाईट लॉंच होणार, एका क्लिकवर मिळणार विविध विषयांची माहिती

राज्य सरकारने पुण्यातील प्रकल्पांना 1100 कोटींचा निधी दिलेला आहे. यात कात्रज-कोंडवा रस्ता सुद्धा आहे. पहिल्या टप्प्यासाठी 200 कोटी रुपये दिले आहे. जिल्हा विभाजनाच्या अनेक मागण्या आमच्याकडे आहेत. त्यामुळे त्यावर एकत्रितपणे विचार करण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सेक्स वर्कर्सच्या मुलांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार; विशेष पॉक्सो कोर्टाची टिप्पणी

दरम्यान, 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील मोठं विधान केलं होत. ते म्हणाले होते की, शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार नाहीत. संबंधित 16 आमदार अपात्र ठरले तरी शिंदे-फडणवीस सरकारला कसलाही धोका नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याचप्रमाणे आला आहे. यावर काल फडणवीस यांनीही स्पष्ट शब्दात आपले मत व्यक्त केले आहे. आता आगामी काळात विधानसभा अध्यक्ष काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us