Devendra Fadanvis : इच्छुकांनो लागा तयारीला… ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणूका होणार… फडणवीसांनी दिले संकेत

Devendra Fadanvis : इच्छुकांनो लागा तयारीला… ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणूका होणार… फडणवीसांनी दिले संकेत

Devendra Fadanvis On Municipal Corporation Election : कोरोना महामारीसह इतर कारणामुळे लांबत गेलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.काही कायदेशीर बाबींमुळे या निवडणुका अद्याप होऊ शकलेल्या नाहीत. गेल्या दीड वर्षांपासून महापालिका निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत. मात्र, आता या निवडणुकांबाबत भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे विधान केले आहे. ते काल (ता.15 मे) पुणे दौऱ्यावर होते.

Devendra Fadanvis : एकनाथ शिंदे राजीनामा देणार?; फडणवीस म्हणतात मूर्खांचा बाजार

फडणवीस म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जुलै महिन्यामध्ये सुनावणी होऊन ऑगस्टमध्ये निकाल येऊन साधारण ऑक्टोबर मध्ये निवडणूक होतील असा अंदाज मी व्यक्त केलेला आहे. लोकसभेच्या निवडणुका या लोकसभेच्या वेळीच होतील विधानसभेच्या निवडणुका विधानसभेच्या होतील. लोकसभेच्या निवडणुका मोदींचे नेतृत्वाखाली आम्ही प्रचंड मतांनी निवडून येऊ त्यानंतर अधिकच काम करून आम्ही विधानसभेमध्ये निवडणुका जिंकू, असही फडणवीस यावेळी म्हणाले.

भारतीय जनता पक्षाच्या ‘घर चलो’ या संपर्क अभियानाचा शुभारंभ आणि भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते.

Prashant Kishor : कर्नाटकमधील विजयामुळे Congress ने फारसं खूश होऊ नये

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गत नऊ वर्षांचा कार्यकाळ हा विकासपर्वचा काळ राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वातील विकासपर्वचे काम कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेपर्यंत पोहचवावे असे आवाहन फडणवीस यांनी केले. तसेच कर्नाटकच्या विजयावर आनंद व्यक्त करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोलाही यावेळी विरोधकांना अर्थात महाविकास आघाडीला लगावला.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच मद्यपी चालकांवर कठोर कारवाई होणार

ते पुढे म्हणाले, आज कर्नाटक निवडणुकीतील विजयावर विरोधक आनंदोत्सव साजरा करत आहेत. बेगानी शादी में अब्दुल दिवाना अशी त्यांची स्थिती आहे. आज विरोधकांनी कितीही आनंदोत्सव साजरा केला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये २८ पैकी २५ जागांवर भारतीय जनता पक्ष नक्कीच विजय होईल. वास्तविक, विरोधकांनी आत्मचिंतन केले पाहिजे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत अर्धा टक्का ही मतं मिळू शकली नाहीत. असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.

Gutami Patil च्या कार्यक्रमात पुन्हा राडा, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

2019 ला जनतेने आपल्याला निवडून दिल युतीला 170 जागा दिल्या, त्यावेळेच्या शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी विचार सोडला. मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी आपली साथ सोडली. महाराष्ट्रात महावसुली सरकार आलं पण आम्ही अडीच वर्ष संघर्ष केला. ज्या सरकारचे मंत्री अधिकारी जेल मध्ये गेले. कोविडच्या काळातील भ्रष्टाचाराच्या कथा तर खूप सुरस आहेत. त्यामुळे हे अशाप्रकारचं सरकार घालवणं गरजेचेच होतं. मात्र जे आपल्या सोबत युतीत निवडणून आले बाळासाहेबांच्या विचाराचे खरे पाईक एकनाथ शिंदे आपल्या सोबत आले आणि आपलं सरकार पुन्हा सत्तेत आले. असं फडणवीस म्हणाले. तर, पदापेक्षा विचार महत्वाचा असतो, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये भगव्याच्या विचार पायदळी तुडवला जात होता. भगव्याचा विचार वाचवण्यासाठी मला घरी बसावं लागलं असत तरी चालल असत. मात्र, माझा पक्षाने उपमुख्यमंत्री करून सन्मानच केला आहे. असं देखील फडणवीस म्हणाले.

दरम्यान, फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीवर शेलक्याके भाषेत केलेल्या टीकेला महाविकास आघाडीचे नेते कशाप्रकारे उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube