Dhairyasheel patil bjp rajya sabha candidate: राज्यसभेच्या राज्यातील दोन जागा रिक्त झालेल्या आहेत, यासाठी निवडणूकही जाहीर झालेली आहे. भाजपने उमेदवारी यादी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातून पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील (Dhairyasheel patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. धैर्यशील पाटील हे रायगड जिल्ह्यातील पेण येथील माजी आमदार आहेत. ते भाजपमध्ये आहेत. भाजपने (>bjp) त्यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपने एकप्रकारे रायगडमध्ये आपली ताकद वाढविली आहे. धैर्यशील पाटील हे लोकसभेसाठी इच्छुक होते.परंतु ही जागा अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला गेली होती. येथून सुनील तटकरे हे खासदार झाले. या विजयात धैर्यशील पाटील यांचेही योगदान आहे.
मी बाबासाहेबांचा नातू, त्या हिशोबाने मी नेताच; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
लोकसभेच्या बारा जागा रिक्त आहे. त्यात महाराष्ट्रातील दोन जागा रिक्त आहेत. मंत्री पियूष गोयल, उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यातील एक जागा भाजपच्या वाटेला आली आहे. तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) गेली आहे.
बदलापूर प्रकरण, महिला पत्रकारांशी बोलताना वामन म्हात्रेंची जीभ घसरली, म्हणाले, तुझ्यावरच बलात्कार …
कोण आहेत धैर्यशील पाटील?
धैर्यशील पाटील यांनी शेकापकडून 2014 ला पेण मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधित्व केले. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यांचा भाजप उमेदवार रवीशेठ पाटील यांनी 24 हजार मतांनी पराभव केला होता. शेतकरी हक्कासाठी लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आहेत. त्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने विभिन्न राज्यों में होने वाले आगामी राज्यसभा के उप-चुनाव हेतु निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/0TFtIv3t9c
— BJP (@BJP4India) August 20, 2024
राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून जाहीर करण्यात आलेली यादी
आसाम : मिशन रंजन दास आणि रामेश्वर तेली
बिहार : मनन कुमार मिश्र
हरियाणा : श्रीमती किरण चौधरी
मध्य प्रदेश : जॉर्ज कुरियन
महाराष्ट्र : धैर्यशील पाटिल
ओडिशा : श्रीमती ममता मोहंता
राजस्थान : सरदार रवनीत सिंह बिट्टू
त्रिपुरा : राजीब भट्टाचार्जी