बदलापूर प्रकरण, महिला पत्रकारांशी बोलताना वामन म्हात्रेंची जीभ घसरली, म्हणाले, तुझ्यावरच बलात्कार … 

बदलापूर प्रकरण, महिला पत्रकारांशी बोलताना वामन म्हात्रेंची जीभ घसरली, म्हणाले, तुझ्यावरच बलात्कार … 

Vaman Mhatre : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणावरून राजकारण देखील चांगलंच तापलं आहे. विरोधक या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.

तर दुसरीकडे शिंदे गटाचे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे (Vaman Mhatre) यांची या प्रकरणात एका महिला बातमीदाराशी बोलताना जीभ घसरली. “तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे”, अशा भाषेत त्यांनी महिला बातमीदारावर आगपाखड केली. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात पत्रकारांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील पत्रकारांमधून होत आहे.

मी असे कोणतेही वक्तव्य केले नाही :  वामन म्हात्रे

तर दुसरीकडे प्रकरण वाढल्यानंतर मी असे कोणतेही वक्तव्य केले नाही माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. अशी प्रतिक्रिया वामन म्हात्रे यांनी दिली. यावेळी ते म्हणाले की, मी असे कोणतेही वक्तव्य केले नाही. या प्रकरणात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माहिती पोहोचवली जात होती. बलात्कार या शब्दाचा वापर केला जात होता. नक्की काय झाले याची माहिती घ्या, असे आवाहन मी पत्रकारांना केले होते मात्र त्यांनी त्याचा चुकीचा अर्थ घेतला असं वामन म्हात्रे म्हणाले.

प्रकरण काय?

बदलापूरमधील (Badlapur) एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आंदोलकांनी सकाळी साडे सहा वाजता शाळेबाहेर आंदोलन सुरु केले आणि त्यानंतर सकाळी साडे दहाच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन सुरु केला. या आंदोलकांवर सायंकाळी 6 च्या सुमारास पोलिसांनी लाठीचार्ज करत पांगवलं तसेच काही आंदोलकांची धरपकड देखील पोलिसांकडून करण्यात आली आहे.

Badlapur Case Update : फडणवीसांची अ‍ॅक्शन, दिरंगाई करणारे तीन पोलीस अधिकारी निलंबित

तर दुसरीकडे राज्य सरकारने या प्रकरणात कारवाईची सुरुवात करत तीन पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याने निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाच्या पुढील तापासाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली असल्याची माहिती देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube