Badlapur Case Update : फडणवीसांची अ‍ॅक्शन, दिरंगाई करणारे तीन पोलीस अधिकारी निलंबित

Badlapur Case Update : फडणवीसांची अ‍ॅक्शन, दिरंगाई करणारे तीन पोलीस अधिकारी निलंबित

Badlapur Case Update : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला फाशी देण्यात यावी या मागणीसाठी गेल्या 8 तासांपासून नागरिक बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलन करत आहे तसेच पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली असा आरोप देखील आंदोलकांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे विरोधक देखील या प्रकरणात राज्य सरकारवर टीका जोरदार टीका करत आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार सरकारने या प्रकरणात पहिली कारवाई केली आहे. सरकारने या कारवाईत तीन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन केलं असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

तर यापूर्वी माध्यमांशी बोलताना या प्रकरणाच्या तापासाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली असल्याची देखील माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली होती.

बदलापूर घटनेनंतर राज ठाकरेंचे मनसैनिकांना थेट आदेश; म्हणाले, आरोपीला…

नेमकं काय घडलं?

बदलापूरमध्ये (Badlapur Case) अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube