काँग्रेस प्रवक्ते अलोक शर्मांकडून मराठी पुरूषांबद्दल वादग्रस्त विधान; फुटलं नव्या वादाला तोंड

  • Written By: Published:
काँग्रेस प्रवक्ते अलोक शर्मांकडून मराठी पुरूषांबद्दल वादग्रस्त विधान; फुटलं नव्या वादाला तोंड

नवी दिल्ली : एकीकडे बदलापूर घटनेवरून वातावरण तापलेले असतानाच आता काँग्रेस प्रवक्ते अलोक शर्मा (Alok Sharma) यांनी मराठी माणसांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. आजतक या वृत्त वाहिनीशी बोलताना शर्मा यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. शर्मा यांच्या या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटलं असून मराठी माणसाचा अपमान केल्याचा आरोप करत शिवसेनेने पोलिसांत तक्रार दाखल करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. (Congress Spoke person Alok Sharma Controversial Statement On Marathi Community)

माझ्या भाषेत सांगायचं तर त्यांचे सा**च काढून टाकलं पाहिजे; बदलापूर घटनेवर अजितदादांचा संताप

नेमकं काय म्हणाले होते शर्मा?

काँग्रेस प्रवक्ते आलोक शर्मा यांनी आजतक या वाहिनीवर चर्चेदरम्यान बदलापूर लैंगिक शोषण (Badlapur Minor Girl Rape Case) प्रकरणावर बोलताना शर्मा यांनी भाजपच्या समकक्षाला बदलापूरमध्ये एका मराठी माणसाने बलात्कार केला तरी तुमचा पक्ष त्याला वाचवणार का? असा प्रतिप्रश्न केला. शर्मा यांनी केलेले विधान हे एकप्रकारे संपुर्ण मराठी पुरूषांना बलात्कारी म्हणण्यासारखे असून, हा मराठी माणसांचा अपमान असल्याची तीव्र भावना व्यक्त केली जात आहे.

सोशल मीडियावर उठली टीकेची झोड

शर्मा यांच्या मराठी माणसांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर एकीकडे शिवसेनेकडून शर्मा यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे सोशल मीडियावर शर्मा यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवली जात आहे. तर, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. महिलांवर अत्याचार करणारी व्यक्ती कोणत्याही भाषेचे, धर्माचे किंवा जातीचे प्रतिनिधित्व करत नाही, तर ती केवळ बलात्कारी आहे, अशी सर्वसाधारण भावना आहे. शर्मा यांनी मराठी समाजाच्या विरोधात असे विधान करून गंभीर गुन्हा केल्याची भावना मराठी माणसांकडून व्यक्त केली जात आहे.

महिलांचा सन्मान करण्याची महाराष्ट्राची परंपरा

महाराष्ट्राला महिलांचा आदर करण्याची गौरवशाली परंपरा आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या. राज्यामध्ये पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या आद्य व्यक्तींचा वारसा आहे. ज्यांनी महिला शिक्षण आणि सक्षमीकरणाची प्रगती केली. महाराष्ट्रात मुलींसाठी पहिली शाळा स्थापन झाली आणि मराठी महिलांनी शिक्षण, विज्ञान आणि कला यासह विविध क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली हा वारसा पाहता, मराठी माणसाला बलात्कारी असा शिक्का लावणे खूप वेदनादायी असून, शर्मा यांच्या या वक्तव्यामुळे केवळ मराठी माणसाचा अपमान झाला नाही तर, महिलांच्या सन्मान आणि समानतेसाठी राज्याची दीर्घकालीन बांधिलकी कमी झाल्याच्या तीव्र भावाना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेसकडून महाराष्ट्राचा नेहमीत तिरस्कार

स्वातंत्र्यापासून मराठी व्यक्ती आणि महाराष्ट्राला तुच्छतेने वागवल्याचा आरोप काँग्रेस पक्षावर होत आला आहे. काँग्रेसला मराठी भाषा आणि लोकांची बदनामी करण्याचा इतिहास आहे आणि शर्मा यांचे विधान त्या परंपरेशी सुसंगत असल्याचे अनेकांचे मत आहे. राज्यांच्या भाषिक पुनर्रचनेदरम्यान मराठी भाषिक प्रदेश (बेळगाव, बिदर, भालकी, कारवार, निपाणी आणि खानापूर) कर्नाटकात विलीन केल्याचा काँग्रेसवर आरोप आहे. शिवाय काँग्रेसमध्ये उच्चपदांवर मराठी नेत्यांची संख्या अल्प असून, स्वातंत्र्यानंतर पक्षाने कधीही मराठी व्यक्तीला अध्यक्षपदी नेमले नसल्याचाही आरोप पक्षावर वेळोवेळी होत आला आहे.

बदलापूर प्रकरण : अक्षय शिंदे गतीमंद? तीन लग्न झालीत का?; आई-वडिलांच्या दाव्याने नवा ट्विस्ट

शर्मा यांच्या विधानावर राज्यातील मोठ्या नेत्यांची चुप्पी

एकीकडे अलोक शर्मा यांनी मराठी पुरूषांची तुलना बलात्कारी अशी केल्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मात्र, दुसरीकडे आतापर्यंत मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या नेत्यांनी यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी शर्मा यांच्या विधानाचा साधा निषेधही नोंदवलेला नसून, शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांनीही यावर सोयीस्करपणे मौन बाळगले असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube