Dhananjay Deshmukh : संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आरोपांची राळ उठवून मंत्री धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) लक्ष्य केले होते. मात्र, धस आणि मुंडे यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी गुप्तभेट झाल्याची माहिती बाहेर येताच राजकीय कल्लोळ निर्माण झाला. धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्यानं त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी भेट घेतल्याचं धस म्हणाले. दरम्यान या भेटीवर संतोष देशमुख (Dhananjay Deshmukh) यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी भाष्य केलं.
डॉ. प्रदीप कुरुलकरने डीआरडीओची गोपनिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचे उघडकीस; एटीएसकडून चार्जशीट दाखल
धस आणि मुंडेंच्या भेटीने मनात चलबिचल नाही. पण, या प्रकणातील एखादाही आरोपी सुटणार, अशी चाहूल लागली तर देशमुख कुटुंबीय टोकोचे पाऊल उचलणार, असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला.
धनंजय देशमुख यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीने मनात चलबिचल झाली नाही. गाव आहे, लोकप्रतिनिधी आहेत, या लढ्याला त्यांनी स्वत:च्या अंगावर घेतलं आहे. या प्रकरणात कुणीही दगाफटका करू नये, एकही आरोपी सुटता कामा नये एवढीच आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. या प्रकऱणाची सध्या चौकशी सुरू आहे. मात्र, या प्रकरणातील एखादाही आरोपी सुटतोय, याची चाहूल लागताच देशमुख कुटुंबीय टोकाचे पाऊल उचलणार, असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला.
Ahilyanagar Crime : वांजोळीत दाणी वस्तीवर जबरी चोरी; चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी
या प्रकरणात एखादा आरोपी वाचवण्यासाठी कोणीही दगाफटका करू नये, ही आपली इच्छा असून सर्व आरोपींना फाशीच झाली पाहिजे, ही आमची मागणी असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले.
कृष्णा आंधळे यांच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल असतानाही तो दोन वर्षे पोलिसांच्या नाकावर टीच्चून केजमध्ये उघडपणे फिरत होता. जर पोलिसांनी त्याला वेळीच आवर घातला असता तर ही घटना घडलीच नसती. त्याला अभय देणारे कोण आहेत, हे तपास यंत्रणांना माहित आहे, असंही धनंजय देशमुख म्हणाले.
आम्हा देशमुख कुटुंबियांना न्याय हवा आहे. त्यासाठी सर्व घटकांची आम्हाला खूप गरज आहे. मनोजदादा आले नसते तर हा खून आठ ते दहा दिवसांत त्यांनी पचवला असता, असंही ते म्हणाले. या प्रकरणातील एकही आरोपी सुटू नये म्हणून मनोज जरांगेंनी धस यांच्यावर टीका करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यात काहीही चूक नाही. समाजात अशी दुसरी घटना होऊ नये म्हणून ते बोलतात. यात त्यांचं एकही वाक्य चुकीचं नाही, असं धनंजय देशमुख म्हणाले.