Download App

लीड देणाऱ्या तालुक्याला 5 कोटींचा निधी देणार; धनंजय महाडिकांचे मतदारांना प्रलोभन

  • Written By: Last Updated:

Dhananjay Mahadik : लोकसभा निवडणुकीच (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली. या काळात उमेदवार हे मतदारांना विविध आमिषं दाखवत असतात, आश्वासनं देत असतात. आता कोल्हापूर मतदारसंघातून (Kolhapur Constituency) महायुतीचे उमेदवार संजय मंडलि (Sanjay Mandalik) यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडणून आणण्यासाठी धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) अनोखं प्रलोभन दाखवलं.

नकली शिवसेना असायला काय ती तुमची डिग्री आहे का? ठाकरेंचा मोदी, शाहांवर जोरदार पलटवार 

खासदार संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी कागल आणि चंदगड या दोन्ही तालुक्यांमधून लीड देणाऱ्या तालुक्याला ५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात येणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

एका बाजूला राजा, दुसऱ्या बाजूला माथाडी कामगारांचा उमेदवार; साताऱ्याच्या लढतीवर पवारांचं वक्तव्य… 

धनंयज महाडिक एका प्रचार सभेत बोलतांना म्हणाले, हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक हे स्वतः कागल तालुक्यातील आहेत. चंदगड तालुक्याची स्थितीही चांगली आहे. यामुळे संजय मंडलिक यांना कोणत्या तालुक्यातून जास्त मताधिक्य मिळतंय पाहू. मी सर्वांना आवाहन करतो की, चंदगड तालुक्यापेक्षा तुम्ही (कागल) जास्त लीड दिलं तर पाच कोटी रुपयांचा अधिकचा नधी देऊ, चला तर मग लागली शर्यत… यामध्ये मी आणि संजय मंडलिक आम्ही दोघेही आहोत. मी अडीच कोटी रुपये आणि संजय मंडलिक अडीच कोटी रुपये देतील. या शर्यतीत आम्ही दोघे आहोत हे ध्यानात ठेवा, नाहीतर तुम्ही उद्या मला एकट्याला धराल, असं महाडिक म्हणाले.

दरम्यान, संजय मंडलिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात शाहू महाराज छत्रपती महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे ही निवडणूक रंगत आणणार आहे. मंडलिक यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडणूक आणण्यासाटी भाजपने कंबर कसली आहे. तर शाहू महाराज यांना निवडून आणण्यासाठी स्थानिक शाहू प्रेमींना आणि मविआच्या नेत्यांनीही जोर लावला आहे.

follow us