Manoj Jarange : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यात आरक्षणाची गरज नसल्याचे म्हटले होते. या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांच्या विरोधात मराठा आंदोलकांनी आंदोलनही केले होते. राज ठाकरे धाराशिवला आले होते तेव्हा मुक्कामी असलेल्या हाॅटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले होते. तर आता मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना इशारा दिला आहे.
आज जरांगे पाटील सोलापूरमधील आपल्या रॅलीत बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीसह महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच मी जर मनात आणलं असतं. मी येड्या दिमागाचा असतो तर म्हणालो असतो यांना धाराशिवच्या बाहेर जाऊ देऊ नका. या शब्दांत राज ठाकरे यांना इशारा दिला आहे.
तर पुन्हा एकदा त्यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या प्रचाराला येणाऱ्या नेत्यांना देखील पाडा, असे आवाहन देखील जरांगे पाटील यांनी सोलापूरमध्ये बोलताना केले. या रॅलीत नारायण राणे यांच्यावर देखील जरांगे पाटील यांनी टीका केली. माझ्या नादी लागू नका. याच्यानंतर बोलला तर धुलाई करेल असा इशारा त्यांनी नारायण राणे यांना दिला आहे.
शरद पवार हे मराठा समाजाचा माथ भडकवत आहे असा आरोप देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. यावर देखील आज जरांगे पाटील यांनी भाष्य केले. शरद पवार हे मराठ्यांचे माथे भडकवितात का नाही हे मला माहिती नाही. कोणाच्या ऐकण्यातला हा समजा नाही. आम्ही आरक्षण घेऊनच राहणार. यांना दंगल घडवायची आम्ही ते होऊ देणार नाही. अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे?
आपल्याकडे किती नोकऱ्या आहेत हे मुलांना माहिती नाही. नोकऱ्या महाराष्ट्रात असतात आणि त्याची जाहिरात उत्तर प्रदेश, बिहारमध्ये प्रसिद्ध करण्यात येते. विधानसभा झाल्यानंतर तुम्हाला याचा सर्व अंदाज येईल.
Bangladesh Protests : मोठी बातमी! बांग्लादेशात स्थापन होणार अंतरिम सरकार, गुरुवारी शपथविधी
जरांगे पाटील यांना देखील याचा सर्व अंदाज येईल. राज्यात आरक्षणाची गरज नाही, महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. इथल्या मुलांना शिक्षण आणि रोजगार याच्यासारख्या संधी कोठेच उपलब्ध होणार नाहीत, आपल्या राज्यात सर्वकाही असं राज ठाकरे म्हणाले होते.