Download App

शिंदे गटाच्या अपात्रता याचिकेवर उच्च न्यायालयाचा ठाकरे गटासह नार्वेकरांना धक्का…

Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर Rahul Narwekarयांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर (Shiv Sena MLA disqualification case)निकाल देताना ठाकरे गटाच्या (Thackeray group) 14 आमदारांना पात्र ठरवले. या निकालाला शिंदे गटानं उच्च न्यायालयात आव्हान दिलं. या प्रकरणावर सुनावणीवेळी न्यायालयाने ठाकरे गटाच्या 14 आमदारांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाला नोटीस बजावली आहे.

शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स 1600 हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टीतही मोठी घसरण

ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी पक्षभंग करुन राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आमदारांसोबत हातमिळवणी करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाविरोधात मतदान केले.

जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवल्या, भाजपचा हल्लाबोल

त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दाखल केली होती. त्या प्रकरणी उच्च न्यायालयाने सुनावणी करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह ठाकरे गटाचे 14 आमदारांना आणि विधिमंडळ सचिवालयाला नोटीस बजावली आहे.

याचिकेवरील सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना ठाकरे गट आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 8 फेब्रुवारीपर्यंत आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या आठवड्यात शिवसेना पक्ष कोणाचा? आणि शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.

राहुल नार्वेकरांनी शिवसेना पक्ष हा शिंदे गटाला बहाल केला. पण त्याचवेळी शिंदे आणि ठाकरे गटाकडून परस्परांच्या आमदारांच्या अपात्रता याचिका फेटाळल्या. त्यामुळे दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरले.

या निकालाविरोधात शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आता सुनावणीदरम्यान न्यायालयाने ठाकरे गटासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनाही नोटीस बजावली आहे.

follow us