Download App

नगरमध्ये मोठी घडामोड! ऐन निवडणुकीच्या काळात गांधी-जगताप कुटुंब एकत्र; संग्राम जगतापांची ताकद वाढणार?

Dilip Gandhi Family Support To MLA Sangram Jagtap In Ahmednagar : नगर शहर (Ahmednagar) विधानसभा मतदार संघात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी (Sangram Jagtap) मोठा राजकीय डाव टाकलाय. आमदार संग्राम जगताप यांनी स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले. या निवडणुकीत आमदार जगतापांच्या प्रचारासह सर्वच प्रक्रियेत गांधी कुटुंबीय सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत. त्यामुळे आता संग्राम जगताप यांची ताकद वाढली (Assembly Election) आहे.

मविआच्या मागणीला मोठं यश! अखेर रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरुन उचलबांगडी

नगरमध्ये संग्राम जगताप अजित पवार गटाकडून मैदानात उतरले आहेत. यावेळी, स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी, भाजप नेते सुवेंद्र गांधी, दीप्तीताई गांधी, देवेंद्र गांधी, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, राष्ट्रवादी समन्वयक सुमित कुलकर्णी, अमित गटने, करण भाळगट, सुमित देवतरसे, नाना जवरे, पवन गांधी तसेच आधी पदाधिकारी उपस्थित होते.

रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांवर झाला गुन्हा दाखल; दिवाळी फराळातून पैशांची पाकिटं वाटल्याचा आरोप

विधानसभा निवडणुकीस नगर शहर मतदार संघामध्ये संग्राम जगताप हे महायुतीचे उमेदवार आहेत. आता त्यांच्या प्रचारासह सर्वच निवडणूक प्रक्रियेत गांधी कुटुंब सक्रिय सहभाग नोंदविणार आहे. आमदार जगताप यांनी स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले. निवडणुकीत गांधी कुटुंब एक निष्ठेने जगतापांना साथ देईल असं गांधी कुटुंबीयांनी स्पष्ट केलं. नगरच्या राजकारणात गांधी परिवाराचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात गांधी-जगताप हे राजकीय कुटुंबीय एकत्र आल्याने ही एक मोठी घडामोड मानली जात आहे.

संग्राम जगताप यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. त्यांनी मागील दहा वर्षांत नगर शहराचा मोठा विकास केला आहे. आम्ही सर्व गांधी परिवार त्यांच्यासोबत आहोत. या निवडणुकीत संग्राम जगताप हेच आमदार होतील अशी प्रतिक्रिया स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी यांनी दिली. जशीजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहेत, तसा नगरमध्ये राजकीय घडामोडींचा वेग वाढलाय. आता तर गांधी घराण्याने संग्राम जगताप यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे नगरमध्ये संग्राम जगताप यांची ताकद आणखीनच वाढल्याचं दिसतंय.

 

follow us