Download App

Dilip Valase Patil : मला राजीनामा देण्यापासून पवार साहेबांनी थांबवलं; ‘त्या’ चर्चांना वळसे पाटालांचा दुजोरा

Dilip Valase Patil : साहेबांचा माझ्यावर रोष असण्याचं कारण नाही. तसेच आमच्यात झालेली खाजगी चर्चा जाहीर सांगता येत नाही. तर मोदी-शाहांची भाषणात नावं घ्यावी लागतात कारण गेली 30-35 वर्षे आम्ही सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमात असतो. तिथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचं नाव घ्यावं लागतं. नावात काय असतं. अशी उत्तर दिलीप वळस पाटलांनी दिली. ते पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट मांजरी येथे पत्रकारांशी बोलत होते.

‘तेव्हा माझ्याही हातून चूक घडली होती’; गडकरींनी सांगितला बांधकाम मंत्री असतानाचा किस्सा!

तर हो, हे खरं आहे. मी वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार होतो. पण मला राजीनामा देण्यापासून पवार साहेबांनी थांबवलं आणि काम करायला सांगितले. असं म्हणत वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या उपाध्याक्ष पदाच्या राजीनाम्याच्या चर्चांना वळसे पाटालांनी दुजोरा दिला. (Dilip Valase Patil on resign of Vasantdada Sugar Institute Vice President Sharad Pawar stop from )

Nitin Gadkari : पुण्यात लवकरच धावणार स्कायबस! गडकरींनी सांगितला नवा प्रोजेक्ट

राष्ट्रीय सहकारी साखर महासंघातर्फे पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट मांजरी येथे तांत्रिक चर्चासात्राचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शरद पवार आणि त्यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे. पण अजित पवारांसोबत बंडात सामील झालेले दिलीप वळसे पाटील बंडानंतर पहिल्यांदाच एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी वळसे पाटलांनी पत्रकांरांच्या विविध प्रश्नांवर उत्तर दिली.

काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?

अजित पवार या कार्यक्रमाला का आले नाही असं विचारलं असता वळसे पाटील म्हणाले, आज कोणतीही बैठक नव्हती. आज परिसंवाद होता. यासाठी परदेशातील तज्ञ आले होते. राज्यातील साखर कारखानदार आले होते. यावेळी प्रश्न उत्तरं ही झाली. आज शासकीय आणि हा असे दोन कार्यक्रम होते. त्यामुळं तिकडे अजित पवार गेले. इथं मी आलो.

तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी वळसे पाटील हे वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार होते. मात्र स्वतः शरद पवारांनी त्यांनी राजीनामा देण्यापासून थांबवले आणि काम करायला सांगितले असल्याची चर्चा होती. त्यावर ते म्हणाले की, याला दुजोरा देत वळसे पाटील म्हणाले, हो, हे खरं आहे. मी वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार होतो. पण मला राजीनामा देण्यापासून पवार साहेबांनी थांबवलं आणि काम करायला सांगितले.

तर शरद पवारांसमोर आल्यावर अवघडल्यासारखं होण्याचं काही कारण नाही. आमच्यातला संवाद हा व्हिएसआयच्या संदर्भातील आणि भविष्यातील योजनांबद्दल होतं. तसेच साहेबांचा माझ्यावर रोष असण्याचं कारण नाही. आमच्यातील खाजगी चर्चा जाहीर सांगता येत नाही. यावेळी पत्रकारांनी मोदी-शहांचा भाषणात उल्लेख करणं आता तुम्हाला बंधनकारक असेल? असं विचारलं असता ते म्हणाले, गेली 30-35 वर्षे आम्ही सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमात असतो. तिथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचं नाव घ्यावं लागतं. नावात काय असतं

त्याचबरोबर नवाब मलिकांबाबत ते म्हणाले, नवाब मलिक बाहेर आले. हा एक न्यायालयीन निर्णय आहे. आमच्या भूमिकेमुळं घडलं असं म्हणणं चुकीचं. ते कोणासोबत याबाबत बोलणं आत्ता अयोग्य. बाहेर सुरू असणाऱ्या चर्चांना काही अर्थ नसतो. मी पवार साहेबांना सोडून कुठंच गेलो नाही, ते आमचे नेते काल ही होते, उद्या ही राहतील. अशी उत्तर दिलीप वळस पाटलांनी दिली.

Tags

follow us